दिव्यातल्या महिलांना माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते शिलाई मशीन व घरघंटी वाटप | #DigitalMaharashtra

ठाणे slider महाराष्ट्र मुंबई

दिवा : कल्याण लोकसभा क्षेत्रात महिला सक्षमीकरणासाठी कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने कळवा मुंब्रा दिवा येथील 3000 पेक्षा जास्त महिलांना मोफत शिलाई मशीन व घरघंटी वाटप करण्यात येत आहे.
दिवा शहरातील साडेसातशे पेक्षा जास्त महिला यासाठी पात्र झाल्या असून त्यापैकी प्रभाग क्रमांक 27 मधील 200 पेक्षा जास्त महिलांना शिलाई मशीन व घर जनतेचे वाटप शिवसेना शहर प्रमुख माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते व स्थानिक नगरसेवक अमर पाटील, नगरसेविका सौ दिपालीताई भगत, विभागप्रमुख उमेश भगत, निलेश पाटील, अँड सौ सुप्रिया आदेश भगत, अर्चना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरित करण्यात आल्या. प्रभाग क्रमांक 28 मध्ये महिलांना वाटप उद्या होणार असल्याची माहिती समाज विकास विभागाचे रावसाहेब त्रिभुवन यांनी सांगितले.

“आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात महिला सक्षमीकरणाचा वेग हा प्रचंड प्रमाणे वाढला आहे. आपल्या कल्याण लोकसभा क्षेत्रात देखील या योजनेचा विस्तार व्हावा व ही योजना या क्षेत्रात तळागाळात पोहोचावी यासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने ज्यांनी प्रयत्न केले आणि ज्यांच्यामुळेच ही योजना आज यशस्वी झाली असे कार्यसम्राट खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचे दिवा शहरातर्फे आभार व्यक्त करत असल्याचे शिवसेना दिवा शहरप्रमुख, मा.उपमहापौर रमाकांत मढवी यांनी सांगितले.

आदरणीय खासदार आदरणीय कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून व शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वाखाली दिवा शहराचा सर्वांगीण विकास झपाट्याने होत आहेत, हा विकास होत असताना दिवा शहरातील आमच्या माता भगिनी देखील आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत, असा विचार आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मनात आला आणि आज प्रभाग क्रमांक २७ मधील २०० पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असल्याचे अँड.सुप्रिया भगत यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *