स्वतःबद्दल

मी रोहित शिर्के, ‘डिजिटल महाराष्ट्र’ या चैनलचा संपादक आहे. गेल्या अनेक वर्षापासून लोकांच्या हितासाठी, देशाच्या विकासासाठी व युवा पिढीला प्रोत्साहित करण्यासाठी आपल्या हक्काच्या अश्या चैनलची सुरूवात करावी असे वाटत होते. मात्र काही कारणास्तव ते शक्य झाले नाही , अनं पत्रकारीता सोडून राजकारणात प्रवेश केला. मात्र तीचं संधी नकळत मला 1 जानेवारी 2019 साली चालून आली. अनं पुन्हा राजकरणातून पत्रकारीतेत प्रवेश केला. खरचं मला सुद्धा विचारात पडण्यासारखा दिवस होता. ज्यावेळी आपल्या ‘डिजिटल महाराष्ट्र’ या सोशल मीडिया चैनलचा शुभारंभ करण्यात आला. भूतकाळात पाहिलेली स्वप्न भविष्यात नक्कीचं पूर्ण होतात, याची जाणीव झाली व इंटर्नशिप करण्याऱ्या सहकार्यांना सोबत घेवून चैनलची सुरूवात केली.
ह्या चैनलची सुरूवात करताना कमीत-कमी बातम्या,जास्तीत-जास्त चांगल्या बातम्या, अप्रतिम मुलाखती, सर्वसामान्य घरातील हिरे शोधण्याचा प्रयत्न, गरजूंना मदतीचा हाथ, सरकारी योजना बातमीद्वारे घराघरात पोहचवणे, सेल्फ रिपोर्टींग, तसेच विचारवंताना समोरासमोर बोलण्याची संधी यांसारख्या असंख्य गोष्टी आहेत. मात्र चैनल सुरू करण्याची जिद्द, खिश्यात अपुरा पैसा तरीही लढण्याची धमक, अशा स्वत:वर अभिमान वाटेल, अश्या नकळत घडत असलेल्या गोष्टी सुद्धा आहेत. त्यामुळे हा चैनल आपल्या समोर सुरू करणे शक्य झाले.
महाराष्ट्रमध्ये जन्मलो असल्याचा गर्व, देशाचे नाव संपूर्ण जगात मोठे व्हावे, म्हणजेचं आपण काही तरी समाजाला देण लागतो, या सर्व गोष्टी मनापासून वाटत असल्या कारणाने पत्रकारीतेच्या माध्यमातून माहितीजनक गोष्टींचा विचार व प्रसार करण्याचा प्रयत्न आपण सुरू केला आहे. मात्र जनसामान्यांची साथ असणे तेवढेचं महत्वाचे. येणाऱ्या दिवसातं काही तरी नवीन , काही तरी वेगळे घेवून येण्याचा प्रयत्न आपल्या समोर करणार आहे. मात्र त्यात कुठे चुकते व कुठे बरोबर याची जाणीव आपण नक्की करून द्यावी. तरचं ‘‘आपल्या हक्काचं मराठी न्यूज चैनल’’ ची टॅगलाईन सार्थ ठरेल.
( चैनल सुरू करण्यासं ज्यांनी ज्यांनी मदतीचा हाथ दिला त्या सर्वांचे आभार.. )
धन्यवाद !!
जय हिंद.. जय महाराष्ट्र!!
रोहित शिर्के – डिजिटल महाराष्ट्र मिडिया सोल्युशन लिमिटेडचे संस्थापक व संपादक आहेत. चैनल सुरू करण्यास सर्वात महत्वाची भूमिका बजावणाऱ्यांमधील महत्वाचे एक नाव.  ID N0 – 00001
प्राजक्ता रोहित शिर्के – डिजिटल महाराष्ट्र मीडिया सोल्युशन लिमिटेड मध्ये संचालक मंडळामध्ये असलेले नाव. तसेच डिजिटल महाराष्ट्र चैनलचा खाते व्यवहार पार पाडण्याची जवाबदारी प्राजक्ता ह्यांच्याकडे सुपूर्त केलेली आहे. ID N0 – 00002
मंगल खारपाटील – डिजिटल महाराष्ट्र चैनलचे कार्यकारी संपादक व वरिष्ठ पत्रकार म्हणून त्यांची ओळख असून डिजिटल महाराष्ट्र परिवाराला नवी उर्जा देण्याचं काम ते करतात. ID N0 – 00003
अनिल गोवळकर – डिजिटल महाराष्ट्र चैनलचे डिजायनर पदी नियुक्त केलेले असून, चैनलच्या मुख्य जवाबदाऱ्यांकरिता सदैव तत्पर असण्यामध्ये ओळख. – ID N0 – 00004
स्नेहा कृष्णा सिंग-डिजिटल महाराष्ट्र चैनलचे मुख्य पत्रकार व चैनल पुढे घेऊन जाणाऱ्यांमध्ये विशेष सहकार्य करणारे म्हणून त्यांची ओळख. ID N0 – 00005
मुज्जमिल करजगी – डिजिटल महाराष्ट्राचे आयटी सेल प्रमुख व पत्रकार असून,  चैनलला पुढे घेऊन जाण्याकरिता परिश्रम घेणाऱ्या व्यक्तींमध्ये मुज्जमिल करजगी यांचे नाव येते. ID N0 – 00006