जि.प.च्या नाविन्यपूर्ण योजनाद्वारे महिलांची उंच भरारी स्वयंसहाय्यता समूहातील १२ महिलांचे ड्रोन पायलट प्रशिक्षण पूर्ण

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रोन पायलट प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या महिलांना मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते आज प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ग्रामपंचायत विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना स्टार्टअप ठाणे ग्रामीण योजना उपजीविका निर्माण करणेकरिता व्यवसाय प्रशिक्षण व सुविधा या योजनेअंतर्गत महिलांना […]

Continue Reading

इव्होनिकतर्फे विशेष रसायने प्रयोगशाळा व कार्यालयाचे ठाण्यात उद्घाटन

८ ठाणे:विशेष रसायने म्हणजेच स्पेशियलिटी केमिकल क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या इव्होनिकने वागळे इस्टेट ठाणे येथे आपल्या नवीन कार्यालय आणि संशोधन तसेच विकास परिसराचे उद्घाटन केले. या समारंभाला मुंबईतील फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीचे कौन्सिल जनरल डॉ. अचिम फॅबिग, इव्होनिक’चे ग्लोबल मॅनेजमेंट प्रतिनिधि आणि इव्होनिक इंडिया टीमचे सदस्य उपस्थित होते. इव्होनिक इंडियाचे नवीन कार्यालय जवळपास एक […]

Continue Reading

आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचे काम पूर्णत्वास

ठाणे- भारतीय स्वांतत्र्य लढ्यातील योद्धा , आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या ठाणे कारागृहातील स्मारकाचा प्रश्न अखेरीस मार्गी लागला आहे. आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले यांच्या पाठपुराव्यामुळे हे स्मारक पूर्णत्वास आले असून येत्या दोन मे रोजी या स्मारकात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे फाशीची शिक्षा ठोठावलेल्या आदिवासी समाजातील महान क्रांतीकारक आद्य […]

Continue Reading

दिव्यातील शेअर रिक्षांच्या दरात करण्यात आलेली भाडेवाढ तातडीने हस्तक्षेप करून नियंत्रित करण्याची दिवा मनसेचे शहर अध्यक्षाची वाहतूक विभागाकडे (RTO) पत्राद्वारे मागणी

दिव्यातील शेअर रिक्षांच्या दरात करण्यात आलेली भाडेवाढ तातडीने हस्तक्षेप करून नियंत्रित करण्याची दिवा मनसेचे शहर अध्यक्षाची वाहतूक विभागाकडे (RTO) पत्राद्वारे मागणी दिवा शहरातील जवळपास ९०% वाहतूक व्यवस्था हि रिक्षा वाहतुकीवर अवलंबून आहे. सुरवातीपासूनच दिव्यात शेअर रिक्षा पध्द्तीनुसार भाडे आकारणी केली जात आहे. नुकतेच दिवा शहरातील शेअर रिक्षा वाहतुकीचे दर हे रिक्षा युनियन कडून वाढवण्यात आले. […]

Continue Reading

जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून बुक कल्चरच्या वाचनप्रिय बालकांचा सन्मान

ठाणे:आभासी जगातून मुलांना बाहेर काढून वाचनाची आवड लावण्याचा विडा बुक कल्चरच्या संचालिका सविता राणे यांनी उचलला आहे. याचाच एक भाग म्हणून जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून बुक कल्चरने मंगळवार, दि. 23 एप्रिल रोजी सायंकाळी ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे वर्षभर सर्वाधिक पुस्तके वाचणाऱया वाचनप्रिय बालकांचा सन्मान केला. प्रमुख पाहूणे म्हणून ठाणे […]

Continue Reading

संजय भोईर यांच्या पाठपुराव्यानंतर कापूरबावडी-कोलशेत-ढोकाळी रोड वाहतुकीसाठी पुन्हा खुला

ठाणे: वाहतुकीला शिस्त लावण्याच्या नावाखाली गेल्या एक वर्षापासून कापूरबावडी पूलाखालून कोलशेत-ढोकाळी कडे जाणारा उजवीकडील मार्ग प्रशासनाने भिंत घालून बंद केला आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालिका आयुक्त आणि वाहतूक विभागाच्या उपायुक्तांकडे पाठपुरावा केल्यानंतर आज अखेर ही भिंत जेसीबीच्या सहाय्याने हटवून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला […]

Continue Reading

डॉ.काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे ‘एन्चेंटिंग मेलोडीज’ हा लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित

ठाणे – कुवेगा – द स्पेस अँड म्युझिक एन्क्लेव्ह एक्सप्रेशन डान्स अँड म्युझिक अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने 26 एप्रिल 2024 रोजी रात्री 8:30 वाजता डॉ.काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे ‘एन्चेंटिंग मेलोडीज’ हा लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सचे राष्ट्रीय विक्रमधारक आणि प्रसिद्ध पार्श्वगायक श्रीकांत नारायण आणि अष्टपैलू पार्श्वगायिका मंजीरा गांगुली आपल्या […]

Continue Reading

डोंबिवलीत रंगला नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाच्यावतीने भव्य कबड्डी स्पर्धेचा थरार भैरवनाथ क्रीडा मंडळ वावे संघाचा 9 गुणांनी दणदणीत विजय

ठाणे:नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ (डोंबिवली – कल्याण) यांच्या विद्यमाने सुधागड तालुका स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन रविवारी लोढा हेरिटेज मैदान, भोपर रोड, देसलेपाडा डोंबिवली पूर्व येथे करण्यात आले होते. दिवसभर चाललेल्या अटी-तटीच्या स्पर्धेत अंतिम सामन्यात भैरवनाथ क्रीडा मंडळ वावे संघाचे 21 गुण व काळभैरव भार्जे संघाने 12 गुण मिळविले. तर वावे संघाचा 9 […]

Continue Reading

श्याम संकिर्तन महोत्सवात भाविक तल्लीन कोपरीच्या चैत्र नवरात्रौत्सवात श्री श्याम खाटु दरबारचा जागर

ठाणे:भगवान श्री. श्याम खाटू संकिर्तन महोत्सव या भक्तीसंगीताच्या कार्यक्रमात हजारो भाविक तल्लीन झाले. ठाणे पूर्व कोपरीतील श्री अंबे मातेच्या नवरात्रौत्सवाच्या अष्टमीला श्री श्याम खाटु दरबारचा जागर करण्यात आला. प्रारंभी माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांच्या हस्ते देवीची पूजा आरती करून होम व कुमारिका पूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे,मुख्यमंत्र्यांच्या […]

Continue Reading

मराठी चित्रपट निर्मात्यांना आवाहान मराठी चित्रपट निर्माते!

आता वेळ आली आहे सर्व मराठी चित्रपट निर्मात्यांनी *निर्माता महामंडळाच्या* छताखाली आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र लढण्याची, एकजूट होण्याची. चित्रपट चॅनेल पासून ते वितरक, थिएटर मालक, ओटीटी चॅनेल, मल्टिप्लेक्स,क्यूब,युफओ आदी मंडळी महाराष्ट्रात मराठी चित्रपट निर्मात्यांची खुल्या आम लुट करत आहे. हिंदी असोशीएशन मराठी चित्रपटवाल्यांची गळंचेपी करत आहे. ते मराठी चित्रपट व्यवसाय शून्य करू पाहत आहे. त्यामुळे […]

Continue Reading