डेब्रिज डम्पिंगला प्रतिबंध करण्यासाठी ठाण्याच्या सर्व प्रवेशद्वारांवर चोवीस तास गस्ती पथके तैनात करण्याचा निर्णय कांदळवन क्षेत्र,पाणथळ जागांच्या संरक्षण आणि संवर्धनाचा आयुक्त राव यांनी घेतला आढावा

ठाणे कांदळवन आणि पाणथळ जागांचे संरक्षण आणि संवर्धन हा अतिशय संवेदनशील विषय आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील कांदळवनांवर कोणत्याही स्वरुपाच्या डेब्रिजची भरणी होणार नाही, यासाठी सहाय्यक आयुक्त यांनी दक्षता घ्यावी. तसेच, ठाण्याकडे येणाऱ्या सर्व प्रवेशद्वारांवर तातडीने रात्रंदिवस गस्ती पथक तैनात करण्यात यावे. डेब्रिज घेऊन येणाऱ्या डम्परमधून ठाणे महापालिका क्षेत्राबाहेर अधिकृत डम्पिंगचा परवाना असेल तरच त्यांना पुढे […]

Continue Reading

केरळमध्ये कधी दाखल होणार मोसमी वारे..?? हवामान विभागाने दिली माहिती

पुणे :– मोसमी पाऊस ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस वेळेत केरळमध्ये दाखल होईल, असेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.* हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. सध्या उत्तर भारतात तापमान वाढले आहे. दक्षिण भारतात सुरू […]

Continue Reading

पोलिसांची गाडी वापरली आणि आरोपी अडकले पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेचे पोलिस असल्याचे सांगत माटुंगा येथील महेश्वरी उद्याननजीक असलेल्या कॅफे म्हैसूर या हॉटेल व्यावसायिकाला सायन येथील त्याच्या राहत्या घरी जाऊन सहा जणांनी २५ लाखांना गंडा घातला आहे. नरेश नायक या व्यावसायिकाच्या घरी ६ आरोपींनी जाऊन निवडणूकीसाठीचा काळापैसा घरी ठेवल्याचा आरोप केला आणि मांडवली करण्यासाठी २५ लाख रुपयांची खंडणी उकळली आहे. या प्रकरणी व्यावसयिकाने दिलेल्या तक्रारीनुसार […]

Continue Reading

घाटकोपरच्या घटनेतून केडीएमसीने धोकायदायक होर्डिंग्सचे स्ट्रकचरल ऑडिट करावं – आ. राजू पाटील यांची मागणी”

कल्याण:घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली ! गेली ३ -४ वर्ष ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील, कल्याण – डोंबिवली क्षेत्रातील आणि कल्याण शीळ फाटा रोडवरील धोकादायक होर्डिंग्सचे स्ट्रकचरल ऑडिट करण्याबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करतोय. पण अद्यापही कोणत्याच प्रकारची कारवाई यावर झालेली नाही आहे. शासानचे […]

Continue Reading

जि.प.च्या नाविन्यपूर्ण योजनाद्वारे महिलांची उंच भरारी स्वयंसहाय्यता समूहातील १२ महिलांचे ड्रोन पायलट प्रशिक्षण पूर्ण

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रोन पायलट प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या महिलांना मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते आज प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ग्रामपंचायत विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना स्टार्टअप ठाणे ग्रामीण योजना उपजीविका निर्माण करणेकरिता व्यवसाय प्रशिक्षण व सुविधा या योजनेअंतर्गत महिलांना […]

Continue Reading

इव्होनिकतर्फे विशेष रसायने प्रयोगशाळा व कार्यालयाचे ठाण्यात उद्घाटन

८ ठाणे:विशेष रसायने म्हणजेच स्पेशियलिटी केमिकल क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या इव्होनिकने वागळे इस्टेट ठाणे येथे आपल्या नवीन कार्यालय आणि संशोधन तसेच विकास परिसराचे उद्घाटन केले. या समारंभाला मुंबईतील फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीचे कौन्सिल जनरल डॉ. अचिम फॅबिग, इव्होनिक’चे ग्लोबल मॅनेजमेंट प्रतिनिधि आणि इव्होनिक इंडिया टीमचे सदस्य उपस्थित होते. इव्होनिक इंडियाचे नवीन कार्यालय जवळपास एक […]

Continue Reading

आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचे काम पूर्णत्वास

ठाणे- भारतीय स्वांतत्र्य लढ्यातील योद्धा , आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या ठाणे कारागृहातील स्मारकाचा प्रश्न अखेरीस मार्गी लागला आहे. आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले यांच्या पाठपुराव्यामुळे हे स्मारक पूर्णत्वास आले असून येत्या दोन मे रोजी या स्मारकात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे फाशीची शिक्षा ठोठावलेल्या आदिवासी समाजातील महान क्रांतीकारक आद्य […]

Continue Reading

दिव्यातील शेअर रिक्षांच्या दरात करण्यात आलेली भाडेवाढ तातडीने हस्तक्षेप करून नियंत्रित करण्याची दिवा मनसेचे शहर अध्यक्षाची वाहतूक विभागाकडे (RTO) पत्राद्वारे मागणी

दिव्यातील शेअर रिक्षांच्या दरात करण्यात आलेली भाडेवाढ तातडीने हस्तक्षेप करून नियंत्रित करण्याची दिवा मनसेचे शहर अध्यक्षाची वाहतूक विभागाकडे (RTO) पत्राद्वारे मागणी दिवा शहरातील जवळपास ९०% वाहतूक व्यवस्था हि रिक्षा वाहतुकीवर अवलंबून आहे. सुरवातीपासूनच दिव्यात शेअर रिक्षा पध्द्तीनुसार भाडे आकारणी केली जात आहे. नुकतेच दिवा शहरातील शेअर रिक्षा वाहतुकीचे दर हे रिक्षा युनियन कडून वाढवण्यात आले. […]

Continue Reading

जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून बुक कल्चरच्या वाचनप्रिय बालकांचा सन्मान

ठाणे:आभासी जगातून मुलांना बाहेर काढून वाचनाची आवड लावण्याचा विडा बुक कल्चरच्या संचालिका सविता राणे यांनी उचलला आहे. याचाच एक भाग म्हणून जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून बुक कल्चरने मंगळवार, दि. 23 एप्रिल रोजी सायंकाळी ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे वर्षभर सर्वाधिक पुस्तके वाचणाऱया वाचनप्रिय बालकांचा सन्मान केला. प्रमुख पाहूणे म्हणून ठाणे […]

Continue Reading

संजय भोईर यांच्या पाठपुराव्यानंतर कापूरबावडी-कोलशेत-ढोकाळी रोड वाहतुकीसाठी पुन्हा खुला

ठाणे: वाहतुकीला शिस्त लावण्याच्या नावाखाली गेल्या एक वर्षापासून कापूरबावडी पूलाखालून कोलशेत-ढोकाळी कडे जाणारा उजवीकडील मार्ग प्रशासनाने भिंत घालून बंद केला आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालिका आयुक्त आणि वाहतूक विभागाच्या उपायुक्तांकडे पाठपुरावा केल्यानंतर आज अखेर ही भिंत जेसीबीच्या सहाय्याने हटवून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला […]

Continue Reading