प्रेयसी एक आठवण या साहित्यकृती मिळाला, पलपब राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार.

ठाणे slider महाराष्ट्र

 

कराड : अर्जुन विष्णू जाधव लिखित ” प्रेयसी एक आठवण ..” या गाजत असलेल्या सत्य प्रेम स्वरूप कादंबरीला मिळाला पलपब पब्लिकेशन संस्था अहमदाबाद ( गुजरात ) या संस्थेचा उत्कृष्ट वाड्:मय निर्मितीसाठी ” पलपब राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार २०२४ ”
पलपब पब्लिकेशन संस्था अहमदाबाद (गुजरात ) ही संस्था गुजरात राज्यात मराठी साहित्य आणि मराठी भाषेचा प्रसार व प्रचार करणारं उत्कृष्ट रित्या कार्य करत आहे. या संस्थेच्या संस्थापिका लीना पाटील या मूळच्या कराडच्या असून सध्या वास्तवास अहमदाबाद गुजरात येथे आहेत. तेथून त्या मराठी साहित्य आणि मराठी भाषेचा प्रसार व प्रचार करणारं उत्कृष्ट काम जोमानी करत आहेत.
कराड येथे पलपब पब्लिकेशन संस्था अहमदाबाद याच्या वतीने रविवार दि: २६ मे २०२४ रोजी एक दिवशीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी राजदूत, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य, प्रसिद्ध लेखक डाॅ. ज्ञानेश्वर मुळे, प्रसिद्ध इतिहासक डाॅ. विनायक जाधव, संमेलनाचे आयोजक सिध्दार्थ पाटील, लीना पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. या साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील साहित्यिक व उत्कृष्ट साहित्यकृतीचा पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
अर्जुन विष्णू जाधव यांनी लिहिलेल्या ” प्रेयसी एक आठवण ..” या गाजत असलेल्या सत्य प्रेम स्वरूप कादंबरीचा ही सन्मान करण्यात आला. ” जागर , बेळगाव कुणाच्या बापाचं , माझा बाप उद्ध्वस्त गिरणी कामगार , बागलकोटची सुगंधा , लेक जगवा लेक शिकवा आणि व्यसनमुक्ती आणि व्यसनमुक्ती..” इत्यादी साहित्य संपदा अर्जुन विष्णू जाधव याची प्रसिद्ध असून आजपर्यंत महाराष्ट्र शासनसह अनेक संस्था, संघटना, मंडळ याचे पुरस्कार मिळाले आहेत. केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या पंतप्रधान घरकुल योजनेवर ,घरकुल घोटाळयावर आधारित नव्या दमाची नवी कादंबरी ” ग्रामपंचायत एक वाटणीदार अनेक..” या नावाने लवकर प्रसिद्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *