ठाणे महानगरपालिकेच्या महिला व पुरुष कबड्डी संघाने चमकदार कामगिरी करीत विजेतेपद पटकाविले.

ठाणे slider महाराष्ट्र

 

ठाणे:तामिळनाडू, बंगलोर, पाचगणी, वर्धा, मध्यप्रदेश आदी विविध ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेच्या महिला व पुरुष कबड्डी संघाने चमकदार कामगिरी करीत विजेतेपद पटकाविले. महापालिकेच्या कबड्डी संघांच्या कामगिरीबद्दल आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महिला व पुरूष कबड्डी संघाचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, क्रीडाअधिकारी तथा प्र.उपआयुक्त मीनल पालांडे, तसेच महिला कबड्डी संघाच्या व्यवस्थापक नीना गोळे, प्रशिक्षक संतोष शिर्के, पुरूष कबड्डी संघाचे व्यवस्थापक गणेश म्हात्रे, प्रशिक्षक जसपालसिंग राठोड उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *