ठाणे,:-आजपासून योजनेची अंमलबजावणी सुरू महिला व ज्येष्ठ नागरिकांना गुलाबपुष्प व पेढे वाटून आनंद साजरा महिलांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी महिला धोरणातंर्गत ठाण्यातील परिवहन सेवेतील बसमध्ये महिलांना तिकिटात 50 टक्के सवलत व महिलांसाठी 50 टक्के राखीव आसने व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास असा महत्वपूर्ण निर्णय घेतला, या निर्णयाची अंमलबजावणी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सन 2024-25 च्या अर्थसंकल्पात केली असून ही योजना आजपासून कार्यान्वित करण्यात आली. महापालिकेने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करुन आज शिवसेनेच्यावतीने ठाणे रेल्वेस्थानक सॅटिस पूल येथे जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी माजी आमदार रविंद्र फाटक, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख, माजी महापौर नरेश म्हस्के परिवहन व्यवस्थापक विलास जोशी, परिवहन व्यवस्थापक शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी कदम, राजेंद्र साप्ते, मनोज लासे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, गुरमुखसिंग स्यान, पवन कदम, पूजा वाघ, शर्मिला पिंपळोलकर, महिला आघाडीच्या वंदना डोंगरे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते.सन 2024-25 च्या अर्थसंकल्पात महिलांना परिवहन सेवेच्या बसतिकिटात 50 टक्के सवलत, तसेच 50 टक्के राखीव आसने व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास हा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांनी घेवून नागरिकांना दिलासा दिल्याबद्दल शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी उपस्थित महिलांना अर्धे तिकिट देवून तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोफत तिकिट देवून ही योजना आजपासून कार्यान्वित करण्यात आली. तिकिटात सवलत मिळाल्यामुळे समस्त महिलावर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये शिंदेसरकारने मोठमोठे निर्णय घेवून महाराष्ट्राचा कायापालट केला. आधुनिक काळामध्ये घडणारा विद्यार्थी सर्वांगाने सक्षम व्हावा यासाठी नवनवीन धोरण अवलंबिले आहे. तरण तरुणीच्या हातांना रोजगार मिळावा यासाठी नवनवे उद्योग महाराष्ट्रात येतील या दृष्टीने देशपातळीवर विविध माध्यमातून कामे सुरू आहेत. माता सुरक्षित तर घर सुरक्षित ही विशेष मोहिम या व अशा अनेक योजना शिंदे सरकार राज्यातील जनतेसाठी राबवित आहे.
ठाणे महापालिका परिवहन सेवेत 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध होती. परंतु आता 75 ऐवजी 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास ही योजना सुरू करण्यात आल्यामुळे याचा निश्चितच फायदा ठाणेकर नागरिकांना होणार असल्याचेही माजी महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले. तसेच यावेळी महिला व ज्येष्ठ नागरिकांना गुलाबपुष्प व पेढे देवून आनंद साजरा करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी केल्याबद्दल महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे देखील शिवसेनेच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.