दिव्यातील वाहतुकीचे नियमन करून बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात दिवा मनसेचे वाहतूक पोलिसांना पत्र

slider ठाणे दिवा महाराष्ट्र

 

काल दिवा स्टेशन रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या रिक्षाने धडक दिल्याने एक ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. दिव्यातील वाहतुकीच्या नियमनाबाबाबत दिवा मनसेकडून वेळोवेळी वाहतूक विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला होता. पण वाहतूक विभागाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कधीच प्रयत्न केले नाहीत. जर वेळीच याबाबतची कार्यवाही झाली असती तर काल घडलेला अपघात टाळता आला असता असे मनसे शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी सांगितले.

दिव्यात भरधाव वेगाने रिक्षा चालवणे, कुठेही कशीही रिक्षा उभी करणे, विनापरवाना रिक्षा चालवणे, गणवेश परिधान न करणे, भंगार मधल्या रिक्षांमधून प्रवासी वाहतूक करणे,प्रवाशांशी उद्धटपणे बोलणे असे प्रकार सर्रासपणे काही रिक्षावाल्यांकडून होत असतात;अशा रिक्षाचालकांवर तसेच इतर बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी दिवा मनसेकडून करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *