मराठी चित्रपट निर्मात्यांना आवाहान मराठी चित्रपट निर्माते!

खेळ आणि मनोरंजन महाराष्ट्र


आता वेळ आली आहे सर्व मराठी चित्रपट निर्मात्यांनी *निर्माता महामंडळाच्या* छताखाली आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र लढण्याची, एकजूट होण्याची. चित्रपट चॅनेल पासून ते वितरक, थिएटर मालक, ओटीटी चॅनेल, मल्टिप्लेक्स,क्यूब,युफओ आदी मंडळी महाराष्ट्रात मराठी चित्रपट निर्मात्यांची खुल्या आम लुट करत आहे. हिंदी असोशीएशन मराठी चित्रपटवाल्यांची गळंचेपी करत आहे. ते मराठी चित्रपट व्यवसाय शून्य करू पाहत आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. सर्व मराठी चित्रपट निर्मात्यांनी 30 एप्रिल 3024 रोजी सकाळी 9.30 वाजता, दादर पूर्व येथील हिदमाता स्थित चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्याजवळ उपस्थित राहावे.
मराठी चित्रपट निर्माते आता आपल्या न्याय हक्कासाठी एकजूट झाले आहेत!
आपले विश्वासू
देवेंद्र मोरे
अध्यक्ष
बाळासाहेब गोरे
कार्याधक्ष
*अ.भा.मराठी चित्रपट निर्माता महामंडळ*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *