जिल्हा परिषद ठाणे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न मैदानी खेळ आयुष्याला नवी दिशा देतात – शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे

ठाणे slider महाराष्ट्र


विद्यार्थ्यांच्या शारीरिक कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद योजनेंतर्गत क्रीडा स्पर्धा केंद्र, तालुका व जिल्हा पातळीवर घेतल्या जातात. आज जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा ऑल सेट्स हायस्कूल भवाळे, ता. भिवंडी येथे आयोजित करण्यात आला होता. शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन उद्घाटन करण्यात आले तसेच मशाल ज्योत पेटवली व पाच तालुक्यातील विद्यार्थी प्रतिनिधींनी मानवंदना दिली.

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. छायादेवी शिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्राधान्य द्यावे. शैक्षणिक शिक्षणासोबतच मैदानी खेळ आयुष्याला नवी दिशा देतात. आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी दररोज खेळावे असे शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

केंद्र पातळीवर प्रथम आलेले संघ तालुका पातळीवर आणि तालुका पातळीवर प्रथम आलेले संघ जिल्हा पातळीवर स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत. या स्पर्धा सांघिक व वैयक्तिक प्रकारात तसेच मुले व मुली या स्वतंत्र गटात घेण्यात आल्या असून सांघिक स्पर्धेत खो खो, कबड्डी, लंगडी, लेझीम या खेळाचा तर वैयक्तीक स्पर्धेत ५० मिटर व १०० मिटर धावणे, २५X४ रिले, लांब उडी व संगीत खुर्ची या खेळाचा मनमुराद आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.

यावेळी गट विकास अधिकारी पंचायत समिती भिवंडी प्रदीप घोरपडे, विस्तार अधिकारी शिक्षण आशिष झुंजारराव, मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षण प्राथमिक विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. डॉ. विद्या शिर्के व रविंद्र तरे यांनी सुत्रसंचलन करून विद्यार्थ्यांमधील उत्साह वाढवीला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *