घाटकोपरच्या घटनेतून केडीएमसीने धोकायदायक होर्डिंग्सचे स्ट्रकचरल ऑडिट करावं – आ. राजू पाटील यांची मागणी”

ठाणे slider

 

कल्याण:घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली ! गेली ३ -४ वर्ष ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील, कल्याण – डोंबिवली क्षेत्रातील आणि कल्याण शीळ फाटा रोडवरील धोकादायक होर्डिंग्सचे स्ट्रकचरल ऑडिट करण्याबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करतोय. पण अद्यापही कोणत्याच प्रकारची कारवाई यावर झालेली नाही आहे.
शासानचे आणि या होर्डिंग मालकांचे काही लागेबंधु आहेत का ? हा प्रश्न आता निर्माण होतोय. घाटकोपरच्या घटनेतून तरी कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेने कान टोचून या धोकायदायक होर्डिंग्सचे स्ट्रकचरल ऑडिट करून घ्यावे, हीच विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *