ठाणे :लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 25-ठाणे लोकसभा मतदारसंघांतर्गत, 146-ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या कामकाजासंदर्भात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, महामानव शिव शाहू फुले आंबेडकर स्मृती सभागृह, बेथनी हॉस्पिटलच्या बाजूला पोखरण रोड नं. 2 येथे सकाळी 11.00 वा. मतदान कक्षामधील सर्व केंद्रस्तरीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची प्रथम प्रशिक्षणपूर्व मार्गदर्शनपर बैठक अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. आशिषकुमार बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीमध्ये डॉ. बिराजदार यांनी 146-ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघांतर्गत मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, शिपाई इत्यादी अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता प्रथम प्रशिक्षण शनिवार दि. 06एप्रिल 2024 रोजी सकाळी 9.00 ते सायं. 6.00 वा. पर्यंत डॉ. काशिनाथ घाणेकर नाटयगृह, खेवरा सर्कल, ठाणे येथे आयोजित करण्यात आले आहे असे सांगून यानुषंगाने मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना ईव्हीएम मशीन हाताळणी प्रशिक्षण देणे, प्रशिक्षण केंद्रावर करावयाची कार्यवाही, टपाली मतदानाबाबतची माहिती विहित नमुन्यांमध्ये भरुन घेणे, मतदान केंद्रावरील करावयाच्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. तसेच टेबलनिहाय हजेरीपट तयार करणे, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची माहिती देणे, त्यांना माहिती पुस्तिका व निवडणूक संबंधी इतर नमुन्यांचे वाटप करणे इत्यादी निवडणूक संबंधी कार्यवाही करण्याबाबत मार्गदर्शन केले.