गुलाम बेगम बादशाह”सोबत नशीब आजमावण्यासाठी भरत जाधव, नेहा पेंडसे, संजय नार्वेकरचा ‘अल्ट्रा झक्कास’वर १२ जून पासून सुरु होणार उत्कंठावर्धक खेळ

खेळ आणि मनोरंजन

अल्ट्रा झकास प्रस्तुत मैत्रीरहस्य आणि अनपेक्षित ट्विस्टची मनमोहक कथा  : “गुलाम बेगम बादशाह” १२ जूनला वर्ल्ड डिजिटल प्रीमिअर!

अल्ट्रा झकास(Ultra Jhakaas) ओटीटी मराठी प्लॅटफॉर्मवर सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट, नाटक, बायोग्राफी प्रदर्शित होत असतात. कुलस्वामिनी, बोल हरी बोल, अदृश्य, अथिरन यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटानंतर अल्ट्रा झकास ओटीटी मराठी आता प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक नवा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट गुलाम बेगम बादशाह. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्लॅटफॉर्मवर लॉन्च झाला आहे.

गुलाम बेगम बादशाह चित्रपटाची कथा 3 मित्रांच्या विक्रम (भरत जाधव), समीर (संजय नार्वेकर) आणि लोरा (नेहा पेंडसे) यांच्याभोवती फिरते. लोरा स्ट्रगलिंग आणि नवीन अभिनेत्री  असते तर विक्रम पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करतो आणि समीर हा नामांकित वृत्तपत्राचा पत्रकार असतो.  परिस्थिती बिकट असल्यामुळे या तिघांनाही चांगले पैसे कमवायचे असतात. आर्थिक भार कमी करण्यासाठी तिघेही विविध मार्ग शोधणं सुरू करतात. तथापि, कथेत पुजारीच्या येण्याने अनपेक्षित ट्विस्ट येतो. तो खरोखर पुजारी आहे की एक रहस्यमय अनोळखी व्यक्ती? विक्रम, समीर, लोराच्या आयुष्यात नक्की काय उलथापालथ होते? तिघांना पैसे कमवण्यासाठी मार्ग मिळतो की नाही? मार्ग शोधता शोधता त्या तिघांमधील मैत्रीवर त्याचा काय परिणाम होतो का? यासाठी मात्र तुम्हाला चित्रपट पाहायला लागेल.

 

“गुलाम बेगम बादशाह” हा मैत्री, रहस्य आणि नशिबाचा पाठलाग करत चित्रपटातील गूढ कथा कशी उलगडून दाखवते यासाठी येत्या १२ जून २०२३ ला अल्ट्रा झकासवर ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नक्की पाहा.

 

रसिकांच्या आवडीनुसार हजारो तासांच्या अफलातून मनोरंजनाची पर्वणी बहाल करणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’वर मराठी भाषेत डब केलेले दाक्षिणात्य आणि हॉलीवूडच्या चित्रपटांसोबतच जुने आयकॉनीक मराठी चित्रपट आणि विविध विषयांवरील वेब सीरिज, किड्स अॅनिमेश, वेब-शो असा मनोरंजनाचा भरगच्चं खजिना उपलब्ध आहे. या कार्यक्रमांची मेजवानी अनुभवण्यासाठी ‘अल्ट्रा झकास’ नक्की डाऊन लोड करा. अधिक माहितीसाठी www.ultrajhakaas.com,

App link: https://ultrajhakaas.app.link

 

‘गुलाम बेगम बादशाह’ या चित्रपटाची प्रोमो लिंक

https://www.youtube.com/watch?v=IiDQNEClhLE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *