लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्यानुषंगाने बँक खाते व्यवहारांवर राहणार करडी नजर

ठाणे:-भारत निवडणूक आयोगाकडील प्राप्त निर्देशानुसार आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निवडणूकीच्या पूर्व तयारीचे कामकाज हे विहित कालावधीत पूर्ण करण्याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक २०२४ या करिता निवडणूक आयोगाने राष्ट्रीयकृत बँका, को-ऑपरेटिव्ह बँका व खाजगी बँकांकडून रोख रक्कम रेमिटन्स द्वारे आणावयाची असेल किंवा पाठवायची असेल तसेच रोखीचे मोठे व्यवहार होत असतील तर […]

Continue Reading

आमदार राजू पाटील यांच्या विशेष निधीतून दिव्यात ३कोटी १२ लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन

  मनसेचे स्थानिक आमदार श्री.राजू पाटील यांच्या विशेष निधीमधून कल्याण, डोंबिवली आणि दिवा परिसरात गेल्या ३ दिवसांत २६.५० कोटींच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. काल दिवा शहरातील विविध विभागांमध्ये आमदार राजू पाटील यांच्या हस्ते ३.१२ कोटी रकमेच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. दिव्यातील बेतवडे गाव, बेडेकर नगर , ओमकार नगर, हंसिका नगर, सद्गुरू वाडी, समर्थ नगर, […]

Continue Reading

चाईल्ड पॉर्न फिल्म / लहान मुलांचे अश्लील चित्रपट पाहणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाचा कडक इशारा

ठाणे:- तुमच्या घरातील एकांतात चाइल्ड पॉर्न फिल्म्स डाऊनलोड करणे आणि पाहणे ही गोपनीयतेची बाब आहे, असे सांगून तुम्ही या गुन्ह्यातून सुटू शकत नाही, कारण जिल्हा पोलीस आणि विविध केंद्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था तुमच्यावर पाळत ठेवून आहेत. चाईल्ड पॉर्न पाहणे आणि अश्लील साहित्य डाउनलोड करणे गुन्हेगारी न करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या […]

Continue Reading

परिवहन सेवेच्या तिकिटात महिलांना 50 टक्के सूट व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास दिल्याबद्दल शिवसेनेने साजरा केला जल्लोष

  ठाणे,:-आजपासून योजनेची अंमलबजावणी सुरू महिला व ज्येष्ठ नागरिकांना गुलाबपुष्प व पेढे वाटून आनंद साजरा महिलांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी महिला धोरणातंर्गत ठाण्यातील परिवहन सेवेतील बसमध्ये महिलांना तिकिटात 50 टक्के सवलत व महिलांसाठी 50 टक्के राखीव आसने व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास असा महत्वपूर्ण निर्णय घेतला, […]

Continue Reading

अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील माता-भगीनींच्या सन्मानासाठी रेशन दुकानावर दरवर्षी मिळणार एक साडी

मुंबई:-राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटूंबातील माता-भगीनींच्या सन्मानासाठी प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत देण्यासाठी वस्त्रोद्योग विभागामार्फत कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू करण्यात आली आहे. या साड्या बाबत काही तक्रारी असतील तर खालील वेबसाईटवर आणि दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावाअसे आवाहन वस्त्रोद्योग विभागाने केले आहे.या अभिनव योजनेमुळे राज्यातील २४ लाख ८० हजार अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील माता-भगीनींना साड्यांचा लाभ मिळाला […]

Continue Reading

ज्येष्ठ पत्रकार एकनाथ बिरवटकर शासनाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मान

ठाणे: महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण, दलितमित्र पुरस्कार महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांना आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. समाजकार्य, पत्रकारिता, साहित्य, धर्म, विद्यार्थी क्षेत्र व विविध चळवळीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल एकनाथ बिरवटकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र […]

Continue Reading

स्व. यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यानी केले अभिवादन

ठा णे :आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी, १२ मार्च, २०२४ रोजी बाळकुम नाका, ठाणे येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक मा. श्री. देवराम […]

Continue Reading

दिव्यातल्या महिलांना माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते शिलाई मशीन व घरघंटी वाटप | #DigitalMaharashtra

दिवा : कल्याण लोकसभा क्षेत्रात महिला सक्षमीकरणासाठी कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने कळवा मुंब्रा दिवा येथील 3000 पेक्षा जास्त महिलांना मोफत शिलाई मशीन व घरघंटी वाटप करण्यात येत आहे. दिवा शहरातील साडेसातशे पेक्षा जास्त महिला यासाठी पात्र झाल्या असून त्यापैकी प्रभाग क्रमांक 27 मधील 200 पेक्षा जास्त महिलांना शिलाई मशीन व घर […]

Continue Reading