ठाणे:-ठाण्याच्या चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या सोनसाखळी चोरीचा गुन्हा ३० जून, २०२४ रोजी दाखल झाला. त्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस पथक तपास करीत होते. पोलिसांनी तीन दिवस परिसरातील सर्वच सीसीटीव्ही तपासले आणि आरोपीच्या परिसरात सापळा रचून ५ जुलै रोजी आशिष कल्याण सिंग(३३) याला ताब्यात घेतल्यानंतर दिलेल्या माहितीवरून २२ ग्राम सोन्यासह अमित सिंग याला ताब्यात घेतले. एकूण ११ गुन्ह्याची उकल करून आरोपींकडून १० लाख १४ हजार रुपयांचे १२२ ग्राम सोने आणि दोन मोटार सायकली हस्तगत करण्याची धडक कामगिरी केली.
सोनसाखळीच्या गुन्ह्यात सक्रिय असलेल्या आरोपींची ओळख पोलिसांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून झाली. पोलिसांनी ५ जुलै रोजी आरोपीला वर्तकनगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. अटक आरोपी आशिष कल्याण सिंग यय ३३ वर्षे, राह, रुनं ७१९, ७ वा माळा, दोस्ती बिनं ०३, कोरस टॉवर समोर, वर्तकनगर ठाणे प, मुळचा रा. ढोका गाव, पोष्ट पैतीखेडा, ठाणे ढोकी, तहसील फतेहबाद, जि आग्रा उत्तर प्रदेश याला अटक करून त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरून अमितकुमार राकेश सिंग(२६) रा. ३०३, शिवसाई अपार्टमेंट, आर. जे. ठाकुर कॉलेजचे समोर, महात्मा फुले रोड, सावरकरनगर, ठाणे (प.) यास बोरीवली रेल्वे स्टेशन येथुन सापळा लावुन ८ जुलै रोजी ९-४२ वाजण्याच्या सुमारास अटक केली. त्यांनी चौकशीत फरारी आरोपी रोहित उर्फ विशाल याच्या सोबत चितळसर, कासारवडवली, कापूरबावडी, खडकपाडा, नौपाडा आणि गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या ९ गुन्ह्याची उकल करीत १०० ग्राम सोन्याचे दागिने हस्तगत केले. आशिष आणि अमित यांनी सोनसाखळीचे केलेल्या गुन्ह्यात त्यांनी चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ गुन्हे आणि ३२ ग्राम सोनायचे दागिने खेचून पोबारा केला. कासारवडवली हद्दीत दोन गुन्ह्यात १५ ग्राम सोनायचे दागिने, कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गुन्ह्यात १० ग्राम सोन्याचा ऐवज, खडक पाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन गुन्ह्यात ४० ग्राम सोनायचे दागिने आणि नौपाडा दापोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ ग्रामचा सोन्याचा ऐवज तर गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ ग्राम सोन्याचा ऐवज असा १२२ ग्राम सोन्याचा ऐवज लांबविला होता. चितळसर पोलिस अधिक तपास करीत आहेत.