जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रोन पायलट प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या महिलांना मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते आज प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ग्रामपंचायत विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना स्टार्टअप ठाणे ग्रामीण योजना उपजीविका निर्माण करणेकरिता व्यवसाय प्रशिक्षण व सुविधा या योजनेअंतर्गत महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण योजना अंतर्गत ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात आले.
जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्वयं सहाय्यता समूहातील महिलांना ड्रोन पायलेट प्रशिक्षण देण्यात आले आहे. सदर योजनेत ६.५२ लक्ष या योजनेची तरतूद करण्यात आली होती. तांत्रिकदृष्ट्या महिलांना सक्षम करण्यासाठी ही ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना राबविण्यात आली आहे, असे महिलांना मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिलांना ड्रोन पायलट प्रशिक्षण दिलं त्यामुळे शेती, आरोग्य, तसेच विविध सर्व्हेक्षण करण्यासाठी याचा फायदा आम्हाला नक्कीच होईल. ड्रोन प्रशिक्षण घेताना तांत्रिक प्रशिक्षण सुध्दा आम्हाला उत्तमरित्या दिले आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे, आम्हाला दिलेल्या या संधी बदल मी आभारी आहे. – दिपाली विजय तुपे, जित स्वंय सहाय्यता समुह, कल्याण
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांना रोजगारक्षम करणे. महिलांची आर्थिक व सामाजिक पातळी उंचावणे यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान ही योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत स्थापित स्वंय सहाय्यता समुहातील एकूण १२ महिलांना डेफी एरोस्पेस (Defy aerospace) या कंपनीमार्फत श्री श्री रुरल डेवलपमेन्ट प्रोग्राम स्किल सेंटर, कनकापुरा रोड, नेयर विविकी कॉटर्स, उदयपूरा बेंगलोर बदमनवरातथीकवल, कर्नाटका येथे ड्रोन पायलटचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
महिलांना तांत्रिक प्रशिक्षण देऊन कौशल्य विकसित करण्यासाठी सदरील योजना महत्वपूर्ण ठरली आहे. प्रशिक्षण देऊन महिलांना स्वावलंबी करण्याचे उद्देश साध्य होताना दिसत आहे.
ड्रोन प्रशिक्षण अंतर्गत स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना दिलेल्या प्रशिक्षणाद्वारे रिअल इस्टेट, शेतीसाठी, पर्यावरण संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन, सर्वेक्षण आणि बांधकाम, सुरक्षा आणि Survoillice, वितरण आणि लॉजिस्टिक या अशा विविध क्षेत्रात महिला उत्तम कामगिरी करू शकतात.