मनसेचे स्थानिक आमदार श्री.राजू पाटील यांच्या विशेष निधीमधून कल्याण, डोंबिवली आणि दिवा परिसरात गेल्या ३ दिवसांत २६.५० कोटींच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. काल दिवा शहरातील विविध विभागांमध्ये आमदार राजू पाटील यांच्या हस्ते ३.१२ कोटी रकमेच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
दिव्यातील बेतवडे गाव, बेडेकर नगर , ओमकार नगर, हंसिका नगर, सद्गुरू वाडी, समर्थ नगर, साबे गाव, जीवदानी नगर, दिवा पश्चिमेला बंदर आळी आणि क्रिश कॉलनी या ठिकाणची रस्ते, गटारं, पायवाटा, स्ट्रीट लाईट, गणेशघाट अशी विविध कामे या निधीतून करण्यात येणार आहेत.