अंगणवाडीतील निकृष्ट डाळीने महिला व बालकांचे जीव धोक्यात | #DigitalMaharashtra
०६ महिने ते ३ वर्षे वयोगतील बालके, गरोधर माता व स्तनदा मातांना देण्यात येणाऱ्या टी. एच. आर. मध्ये मुंगाची दाळ व मिरची पावडर निकृष्ट दर्जाची .
मेहकर (जमिल पठाण) :- महिला व बालकल्याण विभागाकडून अंगणवाडी मार्फत बाल मृत्युं व कुपोषण यांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी विविध उपाय योजना केल्या जातात. त्या नुसार ०६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना, गरोदर माता, स्तनदा माता यांना घरी घेऊन जाण्याचे टी.एच.आर. देण्यात येते. मात्र या टी.एच.आर.चा दर्जा निकृष्ट असल्याने त्याने कुपोषण दूर कसे होणार असा प्रश्न निर्माण होत आहे.
एकात्मिक बाल विकास कडून कुपोषण कमी व्हावे व जन्मजात कुपोषित बालकांचे प्रमाण कमी व्हावे या साठी गरोधार माता व स्तनदा माता,बाल मृत्यू प्रमाण घटावे आरोग्य सुधारावे या साठी विविध उपाय योजना केल्या जातात अश्यात पूर्वी या लाभार्थ्यांना अंगणवाडीच्या माध्यमातून घरी घेऊन जायचे पोषण आहार (टी. एच.आर) म्हणून सुगडी देण्यात येत होती यात बदल म्हणून अत्ता कडधान्य वितरित करण्यात येणार आहे याची सुरवात मे २०१९ पासून झाली तर एक वेळेस ५० दिवसाचे पोषण आहार लाभार्थ्यास देण्यात येतो सध्या ज्या मध्ये मुंग डाळ, गहू, मिरची पावडर, हळद, मीठ, साखर व चणा अश्या सात वस्तू देण्यात येतात मात्र जून महिन्यात देण्यात आलेल्या पोषण आहारात जी मुंग डाळ आहे ती खूपच निकृष्ट दरज्याची असून ती डाळ आरोग्यासाठी घातक ठरू शकते त्या सोबतच जी मिरची पावडर आहे त्याचा दर्जा सुद्धा निकृष्ट असून त्याची पाहणी होणे गरजेचे आहे अंगणवाडी मार्फत वाटण्यात येणाऱ्या पॅकेट बंद डाळीची पाहणी कोण करते हा प्रश्न निर्माण झालेला असून अंगणवाडी कर्मी सरळ सांगतात की जसा माल आला तसा पॅकेट बंद माल आम्ही वितरित करतो.
( मेहकर तालुक्यात ०६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालके,स्तनदा माता व गरोदर माता असे अंदाजे ४ हजाराच्या जवळपास लाभार्थी असून यांना देण्यासाठी टी. एच. आर. आलेला आहे यातील मुंग डाळ व मिरची पावडर निकृष्ट आहे त्याची पाहणी करून निकृष्ट माल पुरवठा करणाऱ्या पुरवठा दारावर कार्यवाही व्हायला हवी व निकृष्ट माल परत घेऊन त्या जागी दर्जेदार मालाचा पुरवठा व्हायला हवा ज्याने शासन ज्या उद्देशाने पोषण आहार पाठवत आहे तो उद्देश सफल होईल)