ठाणे: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्यानुषंगाने 25 ठाणे लोकसभा मतदारसंघांतर्गत, 146 ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीच्या कामकाजासंदर्भात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, महामानव शिव शाहू फुले आंबेडकर स्मृती सभागृह, बेथनी हॉस्पिटलच्या बाजूला पोखरण रोड नं. 2 येथील निवडणूक कार्यालयामध्ये सकाळी 11.00 वा. क्षेत्रिय अधिकाऱ्यांसाठी मतदान यंत्र हाताळणी प्रशिक्षण व बैठक संपन्न झाली.
हे प्रशिक्षण जिल्हाधिकारी ठाणे तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री.अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी श्रीम. मनिषा जायभाये- धुळे यांच्या निर्देशानुसार सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीम. शितल देशमुख, यांच्या नियंत्रणाखाली अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.आशिषकुमार बिरादार यांनी नोडल अधिकारी श्री. हनमंत यमेलवाड यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यातआले होते.
25 ठाणे लोकसभा मतदारसंघाकरिता 20 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्या पार्श्वभूमीवर, विविध सरकारी / निमसरकारी आस्थापनांमधून निवडणुकीच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या क्षेत्रिय अधिकारी यांना कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट मशीनबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण दि.04 एप्रिल 2024 रोजी 146 ओवळा-माजिवडा विधानसभा मतदासंघ निवडणूक कार्यालयात पार पडले. यावेळी निवडणूक आयोगाकडून प्राप्त निर्देशांबाबत सर्वांना माहिती देण्यात आली व मतदानयंत्र माहितीबाबतच्या पुस्तिका उपलब्ध करुन देण्यात आल्या.
मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या प्रथम प्रशिक्षणासाठी EVM मशीन तयार करण्यात आल्या. प्रथम प्रशिक्षणाच्या दिवशी EVM प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यासाठी 24 वर्ग कक्ष तयार करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी मतदान कक्षावर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना क्षेत्रिय अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेले अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी टपाली मतपत्रिकेची सुविधा पुरविण्यात आलेली आहे, अशी माहिती 25 ठाणे लोकसभा मतदार संघांतर्गत 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ अति. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. आशिषकुमार बिरादार यांनी दिली आहे.