ठाणे:नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ (डोंबिवली – कल्याण) यांच्या विद्यमाने सुधागड तालुका स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन रविवारी लोढा हेरिटेज मैदान, भोपर रोड, देसलेपाडा डोंबिवली पूर्व येथे करण्यात आले होते. दिवसभर चाललेल्या अटी-तटीच्या स्पर्धेत अंतिम सामन्यात भैरवनाथ क्रीडा मंडळ वावे संघाचे 21 गुण व काळभैरव भार्जे संघाने 12 गुण मिळविले. तर वावे संघाचा 9 गुणांनी दणदणीत विजय झाला. यावेळी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, कल्याण कुबनपचे विकास देसले, भाजपा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सचिन म्हात्रे, ठाणे शहर भाजपा उपाध्यक्ष रमेश सागळे, पिलोसरी गावचे सरपंच सुधीर केदारी, निलेश हुले, डोंबिवली आरपीआय शहरप्रमुख अंकुश गायकवाड, नंदू परब यांच्यासह सुधागड, ठाणे, कल्याण- डोंबिवलीतील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
दिवसभर अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यांमध्ये नांदगाव विरुद्ध भार्जे व चिवे विरुद्ध वावे असे उपांत्य फेरीचे सामने रंगले. यामध्ये भार्जे 17 गुण तर नांदगाव संघाला चार गुण मिळाले. नांदगाव संघाचा 13 गुणांनी पराभव झाला. तर दुसर्या उपांत्य फेरीत वावे 12 विरुद्ध विचे 7 गुण मिळाले. वावे संघाचा 5 गुणांनी विजय झाला. त्यानंतर अंतिम सामना भैरवनाथ क्रीडा मंडळ वावे व काळभैरव भार्जे यांच्यात सुरूवातीला अत्यंत चुरशीचा झाला. मात्र दुसर्या फेरीत वावे संघाने 9 गुणांची आघाडी घेत 21 गुणांनी विजय संपादन केला. तृतीय स्वयंभू हनुमान संघ चिवे तर नांदगाव संघाला चतुर्थ स्थानावर समाधान मानावे लागले. सर्वोत्कृष्ठ खेळाडू सचिन हिर्डेेकर, उत्कृष्ट चढाई राजेश खैरे, उत्कृष्ट पकड शुभम शिंदे, पब्लिक हिरो ठरला राज ठाकूर तसेच शिस्तबद्ध संघ म्हणून उसाळे संघाला गौरविण्यात आले.
सुधागड तालुक्यातील नामवंत 16 संघांचा या स्पर्धेत समावेश होता. स्पर्धेचे उद्घाटन पत्रकार अजय जाधव यांच्याहस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जयेश ठाकूर, कार्याध्यक्ष राजू शेडगे, सुरेश चव्हाण, उपाध्यक्ष महेश अधिकारी, वामन कडू, सरचिटणीस नामदेव महाले, चिटणीस जगदीश म्हस्के, खजिनदार अमोल पालांडे, उपखजिनदार निखिल ढीसे, हिशेब तपासनीस जनार्दन बेलोसे, गोविंद शिंदे, क्रीडा समितीप्रमुख शशांक ससर, सल्लागार सचिन ठाकूर, दिलीप कोंडे, चंद्रकांत बेलोसे, दत्तात्रय लहाने, उल्हास पालांडे, गोपाळ साठे, विनोद ससर, मंगेश चरवट, महेश चव्हाण, हरिश्चंद्र चव्हाण, सुरेश ठकोरे, यांच्यासह सुधागड तालुक्यातील सर्व क्रीडा रसिक, खेळाडू, हितचिंतक, देणगीदार, यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून क्रीडा महोत्सवाची शोभा वाढवली. तसेच अलंकार मनवी यांनी उत्कृष्ट सुत्रसंचालन करून क्रीडा रसिकांची मने जिंकली.
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 21 हजार आणि आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 15 हजार आकर्षक चषक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 10 हजार व आकर्षक चषक तर सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पक्कड, पब्लिक हिरो यासाठी आकर्षक चषक देण्यात आली. या स्पर्धेचे लाईव्ह युट्यूब प्रक्षेपण करण्यात आले.