ठाणे :जय माता दी …चलो बुलावा आया है माता ने बुलाया है…, यासह मायलेक आणि पितृसंस्कृती जपणाऱ्या विविध हिंदी व मराठी भजनांच्या माध्यमातुन कोपरीतील चैत्र नवरात्रौत्सवात शुक्रवारी रात्री भक्तिमय व प्रसन्न वातावरणात `माता की चौकी’ हा सिंधी भजन संध्येचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी देवीची साग्रसंगीत महाआरती करण्यात आली. याप्रसंगी, सौ.लता एकनाथ शिंदे, शिवसेना पदाधिकारी प्रकाश कोटवानी आदीसह शिवसेना पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.
ठाणे पुर्वेकडील कोपरी, येथील संत तुकाराम महराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्यावतीने श्री अंबे मॉ चैत्र नवरात्रौत्सवामध्ये सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरु आहे. या महायज्ञाच्या चौथ्या दिवशी उल्हासनगर येथील प्रसिद्ध गायक कमलेश कपुर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी `माता की चौकी ‘ कार्यक्रम सादर केला. माता राणीच्या उदो उदोसह शिवशंकर तसेच झुलेलाल च्या भजनांना असंख्य भाविकांनी भक्तीभावपूर्ण दाद दिली.
सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञानिमित्ताने मातेचा विशेष दरबार सजविण्यात आला होता. कमलेश कपुर यांच्या प्रत्येक भजनावर वातावरण प्रसन्न होऊन माताराणीचा भाविकांकडून जयजयकार केला जात होता. तर अनेक भाविकांनी तल्लीन होत मातेच्या आराधने बरोबरच ठेकाही धरला.`एकविरा आई तू डोंगरावरी’ लल्लाटी भंडारी, आई भवानी तुझ्या कृपेने ‘ जय देवा श्री गणेशा या गीतानाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सांगता माताराणीचा प्रसाद वाटप करून झाली.