**कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावे अखेर नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट: मनसे आमदार राजू पाटील यांची अथक पाठपुरावा फळाला**

ठाणे

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी गेले अनेक वर्षे तेथील ग्रामस्थ करत होते. यासाठी त्यांनी सहावेळा ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार घातला होता. तसेच ही गावं नवी मुंबई पालिकेत समाविष्ट करण्याकरिता मनसेचे आमदार राजू पाटील स्वतः निवडून आल्यापासून करत आहेत आणि १४ गावं सर्वपक्षीय विकास समिती पाठपुरावा करत होती. मात्र कोरोना काळात हा विषय मागे पडला पण कोरोना नंतर सदर विषय मनसे आमदार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा मांडला. यावेळी तात्कालीन पालकमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही गावं नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याची घोषणा केली होती. मात्र, घोषणा झाल्यानंतर हा विषय अडकून राहिला होता. हीच बाब लक्षात आल्या नंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी 20 ऑगस्ट 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आणि अर्थसंकल्पिय अधिवेशनात लक्षवेधीला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा अशी मागणी केली.यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राची तातडीने दखल घेतली आणि सप्टेंबर 2022 रोजी बाबतचा जीआर काढला आहे. त्यामुळे ही गावं आता नवी मुंबई पालिकेत समाविष्ट होणार आहेत, असे सांगितले.

यानंतरही मनसे आमदार राजू पाटील यांनी पाठपूरवा चालूच ठेवला. मात्र प्रशासन तांत्रिक मुद्दे काढत असल्याने हा विषय लांबणीवर जात होता अखेर मार्च 2024 ला ठाणे जिल्ह्यात झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा देखील केली होती. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,कल्याण लोकसभेचे खा. डॉ.श्रीकांत शिंदे, १४गाव विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, यांसह १४ गावं विकास समितीची मुख्यमंत्र्यांच्या शासकीय वर्षा या निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत १४ गावं नवी मुंबईत समाविष्ट करण्याची अंतिम अधिसूचना शासनाकडून जाहीर करण्यात आली.

यानंतर आता पुढची प्रक्रिया चालू झाली असून नवीमुंबई पालिकेच्या 4 अभियंत्यांना मुळ विभागाचे कामं संभाळून अतिरिक्त कामकाज (14 गावांचे ) पहावयाचे आहॆ, नवीमुंबई पालिकेच्या आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आदेश काढले आहेत. दरम्यान 14 गावांच्या मालमत्ता हस्तांतरणाच्या कामाला 11 तारखेपासून कामाला करणार सुरवात करणार असल्याची माहिती नवीमुंबई महापालिका आयुक्तानी दिली आहॆ.त्यामुळे १४ गावांचा नवी मुंबई मनपा प्रवेशाचा वनवास आता संपला आहॆ.

याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितलं की नवी मुंबई महानगरपालिकेत प्रवेशासाठी कल्याण ग्रामीणमतदारसंघातील १४ गावांनी ग्रामपंचायत निवडणुकांवर सहा वेळा बहिष्कार टाकला होता. मी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर १४ गाव विकास समितीला सोबत घेऊन अनेक वेळा पाठपुरावा करून अधिवेशनात प्रश्न देखील उपस्थित केला होता. त्यावेळी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांनी १४ गावं नवी मुंबई मनपात समाविष्ट करण्याची घोषणा केली होती.मात्र काही तांत्रिक अडचणी येत असल्याने
शासनाची अधिसूचना निघाली नव्हती. यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू होता. अखेर आज शासनाने १४ गाव नवी मुंबईत समाविष्ट करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. १४ गावांच्या एकजुटीचा खऱ्या अर्थाने आज विजय झाला आहे. मी १४ गाव सर्व पक्षीय विकास समितीचे,नागरिकांचे अभिनंदन आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, असं आमदार राजू पाटील यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *