ठाणे, दि.12:- फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 174(1)(अ)(ब) व (क) अन्वये प्राप्त झालेल्या अकस्मात मृत्यू समरी प्रकरणांबाबत फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 176(2) नुसार मयत व्यक्तीचे मृत्यूचे कारण दर्शविणारे व चौकशी करण्याबाबतचे ठाणे उपविभागाचे अधिकार उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, ठाणे उपविभाग या कार्यालयास आहेत.
ठाणे महसूल उपविभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडून माहे एप्रिल-2024 ते जून-2024 या कालावधी एकूण 70 अकस्मात मृत्यू समरी नोंद मंजूर होणेबाबतची प्रकरणे (यादी सोबत जोडल्याप्रमाणे) उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, ठाणे उपविभाग या कार्यालयास प्राप्त झालेली आहेत.
सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी व अधिक माहितीसाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, ठाणे उपविभाग या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे नायब तहसिलदार राहुल सूर्यवंशी यांनी कळविले आहे.