मुंबई डबेवाले आणि चर्मकार असोशिएशनचे अनेक वर्षापासूनचे घरांचे स्वप्न पूर्ण होणार

ठाणे

मुंबई:-मुंबई डबेवाला आणि चर्मकार असोशिएशनी यांची अनेक दिवसापासून हक्कांची घराचे मागणी होती यासाठी आमदार श्रीकांत भारतीय व अ‍ॅड. अमृता गुरव यांचे माध्यमातून पाठपुरावा चालू होता याबाबती मा. देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थानी नुकतीच बैठक संपन्न झाली सदरचे बैठकीसाठी दिवे अंजूर ठाणे येथील जागा मालक रूद्रप्रताप त्रिपाठी, मुंबई डबेवाला असोसिएशनचे पदाधिकारी व चर्मकार निवारा असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत दिवे अंजूर ठाणे येथे 46 एकर जागेत 12000 घरे पंतप्रधान आवास योजनेखाली मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यासाठी लागणारी सर्व कार्यवाही म्हाडा मार्फत पूर्ण करण्याचे मा. देवेंद्र फडणवीस यांनी आदेशित केले. सदरचा प्रकल्प हा पब्लिक प्रायवेट पार्टनरशिप तत्वावर करण्यात येणार असून या माध्यमातून डबेवाले असोसिएशन आणि चर्मकार असोसिएशन यांना सेलेबल 500 स्क्वे. फूटची 12000 घरे 46 एकर जागेवर देण्यात येणार आहे. सदर गृहप्रकल्पात मंदीर व गोशाळा, शाळा, हॉस्पिटल, गार्डन, शॉपिंग सेंटर, कम्युनिटी हॉल, व्यायामशाळा यासारख्या अनेक अ‍ॅमेनिटी देण्यात येणार आहे असे जागा मालक श्री. त्रिपाठी यांनी सांगितले. डबेवाला असोशिएशन व चर्मकार असोशिएशनची 25 वर्षापासूनची हक्काचे घराची मागणी आज पूर्णत्वास आली. मा. देवेंद्र फडणवीस यांनी जमीन मालक श्री. त्रिपाठी यांना 12000 घरांसाठी शासनातर्फे आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले सदरचे बैठकीस मुंबई टिफीन बॉक्स असोशिएनचे अध्यक्ष उल्हास मुके, रामदास करवंदे सचिव किरण गवांदे व सदस्य, चर्मकार निवारा असोसिएशनचे अध्यक्ष अशोक गायकवाड, सचिव विभीषण कानडे व सदस्य, त्यांचे कायदेशिर सल्लागार अ‍ॅड. दिगंबर देशमुख, अ‍ॅड. जयश्री माने हे उपस्थित होते. सदरचे बैठकीचे आयोजनाचे सर्व श्रेय आमदार श्रीकांत भारतीय व अ‍ॅड. अमृता गुरव यांना देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *