जिल्हा परिषदेतील राहनाळ शाळेत इकोफ्रेंडली होळी धुळवड

ठाणे slider भारत

 

ठाणे :भारतीय संस्कृतीतील सण समारंभ उत्सव म्हणजे आनंदाचा ठेवा. सध्याच्या बदललेल्या पर्यावरणाच्या वातावरणामध्ये नैसर्गिक आणि इकोफ्रेंडली होळी साजरी करणे ही काळाची गरज ठरत आहे. आज जिल्हा परिषद केंद्र शाळा, राहनाळ, तालुका भिवंडी येथील विद्यार्थ्यांनी इकोफ्रेंडली होळी व धुळवड साजरी करून आनंद साजरा केला
राहनाळ शाळेत होळी व धुळवड सणाच्यानिमित्ताने पारंपारिक होळी बरोबरच राजश्री पाटील, अनघा दळवी, चित्रा पाटील या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी बीट, गाजर, झाडाची पान-फले आणि हळद यांच्यापासून नैसर्गिक रंग तयार केले. आजूबाजूचा कचरा, शेणाच्या गोवऱ्या, कापूर, विद्यार्थ्यांच्या मनातील वाईट विचार नाहिसे करण्यासाठी होळीच्या भोवती पताका म्हणून मुलांच्या मनातील नकारात्मकता कागदावर लिहून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थीनी सिद्धी पांडे व परी बिंद यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली. यावेळी संध्या जगताप, रसिका पाटील यांनी होळीची पारंपरिक गीते सादर केली. होलीकेची कथा अंकुश ठाकरे यांनी सांगितली.

केंद्रप्रमुख शरद जाधव यांनी होळी सणाचा विज्ञानाशी असलेला संबंध उलगडून सांगितला. ग्रामपंचायत लिपिक विश्राम नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमिला कडू, सदस्य प्रतिभा नाईक, पालक तसेच विद्यार्थीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी होळीसाठी जिवंत झाड तोडू नये, पाण्याची बचत करावी, केमिकल मिश्रित रंग वापरू नये, प्लॅस्टिक पिशव्या आणि फुगे एकमेकांवर मारू नये असा सल्ला शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.

पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी मोलाची कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांना वेळोवेळी माहिती देत त्याबद्दल जाणिव करून देणे आणि प्रत्यक्षात कृती करण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. डाग लावण्यापेक्षा नकारात्मक विचारांचे डाग धुवून टाकावेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *