कल्याण फाटा : कल्याण फाटा या परिसरामध्ये दुपारी सुमारे 12 वाजल्यापासून ते आतापर्यंत लोड शेडिंग ची समस्या सोडवण्यात आलेली नाही. यात संदर्भात नागरिकांनी दुपारीच तक्रार केली होती पण तक्राराचे निवारण अद्याप झालेले नाही असल्याचे नागरिकांनी रोष व्यक्त केलेल्या आहे.
टोरेंट पावरच्या टोल फ्री नंबर वर कॉल केल्यानंतर बरेच पेंडिंग केसेस असल्याचे टोरेंट कर्मचाऱ्यांनी सांगितले. अशा परिस्थितीमध्ये वृद्ध आणि लहान मुले अतिशय हैराण झालेले आहेत. पावसाळा असल्यामुळे टोरेंट पॉवर ने त्यांच्या सर्विसेस मध्ये कर्मचाऱ्यांची वाढ केली पाहिजे आणि नागरिकांना योग्य ते सर्विस दिली पाहिजे असे लोकांचे म्हणणे आहे.
भरमसाठ बिल येत असून सुद्धा जर अशा पावसाळ्यामध्ये जर अशा प्रकारचे सर्विसेस देत असल्यास येथे टोरेंट पॉवर चे काय काम ? असे नागरिकांनी रोष व्यक्त केले आहे. जर टोरेंट पॉवर ने या पावसाळ्या महिन्यात योग्य सर्विस दिले नाही तर ग्राहक संरक्षण मंच कडे त्याचबरोबर वीज मंत्रालय तक्रार करून दाद मागितली जाईल असे नागरिकांचे म्हणणे आहे.