#pandharpur : आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल रखुमाईची विधीवत शासकीय महापूजा करण्याचे भाग्य यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले. सलग दुसऱ्या वर्षी सावळ्या विठुरायाचे मनोहर रूप डोळ्यात साठवून ठेवत त्याची मनोभावे आराधना करण्याची संधी त्यांना मिळाली.
“यंदा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मुक्काम पोस्ट वाकडीचे भाऊसाहेब मोहनीराज काळे आणि सौ.मंगल भाऊसाहेब काळे या मानाच्या वारकरी दांपत्यासह शासकीय पूजा करण्याचे सौभाग्य आम्हाला मिळाले. हे माऊली गेल्या २५ वर्षांपासून भास्कर गिरी महाराज यांच्यासोबत देवगड ते पंढरपूर अशी पायी वारी करतात. त्यांना देखील नमन करून त्यांना सुख शांती समाधान प्राप्त व्हावे अशी मनोकामना व्यक्त केली.
राज्यात नुकतीच पावसाला सुरुवात झाली असून यंदाचे पर्जन्यमान समाधानकारक ठरावे आणि राज्यातील बळीराजा सुखी समाधानी व्हावा हे आणि एवढेच मागणे मी विठुरायाच्या चरणी मागितले. जनसेवेचा जो वसा माझ्या हाती पांडुरंगाने सोपवला आहे तो असाच पुढे नेण्याचे बळ मला मिळावे एवढीच इच्छा मनोमन त्याच्याकडे व्यक्त केली. – श्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
यावेळी माझे वडील संभाजी शिंदे, पत्नी सौ. लता शिंदे, मुलगा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, सून सौ. वृषाली श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश तसेच मंत्रिमंडळातील माझे सहकारी मंत्री, आमदार उपस्थित होते.
#Pandharpur #Vitthal #VitthalRakhumai #Pandurang