घाटकोपरच्या घटनेतून केडीएमसीने धोकायदायक होर्डिंग्सचे स्ट्रकचरल ऑडिट करावं – आ. राजू पाटील यांची मागणी”

  कल्याण:घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली ! गेली ३ -४ वर्ष ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील, कल्याण – डोंबिवली क्षेत्रातील आणि कल्याण शीळ फाटा रोडवरील धोकादायक होर्डिंग्सचे स्ट्रकचरल ऑडिट करण्याबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करतोय. पण अद्यापही कोणत्याच प्रकारची कारवाई यावर झालेली नाही आहे. […]

Continue Reading

आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचे काम पूर्णत्वास

  ठाणे- भारतीय स्वांतत्र्य लढ्यातील योद्धा , आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या ठाणे कारागृहातील स्मारकाचा प्रश्न अखेरीस मार्गी लागला आहे. आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले यांच्या पाठपुराव्यामुळे हे स्मारक पूर्णत्वास आले असून येत्या दोन मे रोजी या स्मारकात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे फाशीची शिक्षा ठोठावलेल्या आदिवासी समाजातील महान क्रांतीकारक […]

Continue Reading

श्याम संकिर्तन महोत्सवात भाविक तल्लीन कोपरीच्या चैत्र नवरात्रौत्सवात श्री श्याम खाटु दरबारचा जागर

  ठाणे:भगवान श्री. श्याम खाटू संकिर्तन महोत्सव या भक्तीसंगीताच्या कार्यक्रमात हजारो भाविक तल्लीन झाले. ठाणे पूर्व कोपरीतील श्री अंबे मातेच्या नवरात्रौत्सवाच्या अष्टमीला श्री श्याम खाटु दरबारचा जागर करण्यात आला. प्रारंभी माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांच्या हस्ते देवीची पूजा आरती करून होम व कुमारिका पूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी […]

Continue Reading

माजिवडा येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

ठाणे- माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर आज महापालिकेने कारवाई केली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागाच्या वतीने करण्यात आली. या कारवाईत मोघरपाडा, तलावाच्या शेजारी सुनिल सिंग (बांधकामधारक) यांचे चालु असलेले तळ + २ मजली आर.सी.सी. इमारतीचे बांधकाम निष्कसनाची कारवाई करण्यात आली. इमारतीचे दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचे बांधकाम गॅस कटर व ट्रक्टर ब्रेकरच्या […]

Continue Reading

विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांना आता निवडणुकीचे काम करणे अनिवार्य आहे असा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने दिलेला आहे

    माननीय उच्च न्यायालयाने 2019 ला 8300/ 2019 यासाठी मध्ये रिपिटेशन मध्ये निर्णय दिलेला होता, सदर निर्णयामध्ये माननीय न उच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले होते की विनाअनुदानित शाळा ह्या ज्या संस्थांखाली रजिस्टर झालेले आहेत त्या संस्था ज्या आहेत त्या संस्था महाराष्ट्र शासनमध्ये नियमानुसार रजिस्टर केलेले असल्यामुळे भारतीय संविधानानुसार संस्थाचे रजिस्ट्रेशन झालेला आहे तर शाळांचे देखील […]

Continue Reading

ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. प्रशांत कदम सचिवपदी जगदीश शिंगाडे यांची बहुमताने निवड

  ठाणे ः ठाणे जिल्हा बार असोसिएशनची (वकील संघटना) सन 2024-2026 साठी निवडणूक 6 एप्रिल 2024 रोजी पार पडली. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यावेळी अ‍ॅड. प्रशांत गणपत कदम (आप्पा) यांना 859 मते मिळाली तर त्यांचे विरोधक अ‍ॅड. संजय अनंत म्हात्रे यांना 497 मते मिळाली. कदम यांना 362 मतांनी दणदणीत विजय संपादन केला. तर […]

Continue Reading

146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ईव्हीएम यंत्र हाताळणी प्रशिक्षण संपन्न.

  ठाणे: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्यानुषंगाने 25 ठाणे लोकसभा मतदारसंघांतर्गत, 146 ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीच्या कामकाजासंदर्भात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, महामानव शिव शाहू फुले आंबेडकर स्मृती सभागृह, बेथनी हॉस्पिटलच्या बाजूला पोखरण रोड नं. 2 येथील निवडणूक कार्यालयामध्ये सकाळी 11.00 वा. क्षेत्रिय अधिकाऱ्यांसाठी मतदान यंत्र हाताळणी प्रशिक्षण व बैठक संपन्न झाली. हे प्रशिक्षण जिल्हाधिकारी […]

Continue Reading

ठाणे महानगरपालिकेच्या महिला व पुरुष कबड्डी संघाने चमकदार कामगिरी करीत विजेतेपद पटकाविले.

  ठाणे:तामिळनाडू, बंगलोर, पाचगणी, वर्धा, मध्यप्रदेश आदी विविध ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेच्या महिला व पुरुष कबड्डी संघाने चमकदार कामगिरी करीत विजेतेपद पटकाविले. महापालिकेच्या कबड्डी संघांच्या कामगिरीबद्दल आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महिला व पुरूष कबड्डी संघाचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, क्रीडाअधिकारी […]

Continue Reading

निवडणूक संदर्भातील विविध परवानग्यांसाठी ‘सुविधा पोर्टलचा’ वापर करा-जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे

ठाणे:लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार स्तरावर अथवा पक्षीय स्तरावर प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी सुविधा पोर्टल suvidha.eci.gov.in चा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण, मतदार जनजागृती स्वीप, मनुष्यबळ, वाहने, टपाली मतपत्रिका, आचारसंहिता, ईव्हीएम मशीन, मतदान केंद्र नियोजन, कायदा व सुव्यवस्था, निरिक्षकांची व्यवस्था, स्ट्राँग रुम व्यवस्था, […]

Continue Reading

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

ठाणे :लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 25-ठाणे लोकसभा मतदारसंघांतर्गत, 146-ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या कामकाजासंदर्भात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, महामानव शिव शाहू फुले आंबेडकर स्मृती सभागृह, बेथनी हॉस्पिटलच्या बाजूला पोखरण रोड नं. 2 येथे सकाळी 11.00 वा. मतदान कक्षामधील सर्व केंद्रस्तरीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची प्रथम प्रशिक्षणपूर्व मार्गदर्शनपर बैठक अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. आशिषकुमार […]

Continue Reading