८
ठाणे:विशेष रसायने म्हणजेच स्पेशियलिटी केमिकल क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या इव्होनिकने वागळे इस्टेट ठाणे येथे आपल्या नवीन कार्यालय आणि संशोधन तसेच विकास परिसराचे उद्घाटन केले. या समारंभाला मुंबईतील फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीचे कौन्सिल जनरल डॉ. अचिम फॅबिग, इव्होनिक’चे ग्लोबल मॅनेजमेंट प्रतिनिधि आणि इव्होनिक इंडिया टीमचे सदस्य उपस्थित होते.
इव्होनिक इंडियाचे नवीन कार्यालय जवळपास एक लाख चौरस फूट क्षेत्रावर पसरलेले आहे आणि त्यात औषधनिर्माण, मौखिक आरोग्य , वैयक्तिक निगा, अन्न, खाद्यपदार्थ, शेती (इन-कॅन फॉर्म्युलेशनसह) टायर, रबर, प्लास्टिक, तेल आणि वायू, बॅटरी, धातू तसेच सिरामिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, टोनर, कागद, गोंद आणि सीलंट, घरगुती देखभाल, रंग आणि कोटिंग्ज, मुद्रण शाई, बांधकाम, इमल्शन, कापड, धातू कार्यरत द्रव आणि कंपाऊंडिंग यासारख्या उद्योगांची पूर्तता करणाऱ्या सध्याच्या व्यवसायाकरिता उपलब्ध अत्याधुनिक प्रयोगशाळा आहेत. यावर्षी नवीन प्रयोगशाळा देखील सुरू केल्या जातील, ज्या बायो-सर्फेक्टंट्स, त्वचा आणि केसांची उत्पादने, ऑटोमोटिव्ह, फर्निचर आणि मॅट्रेस वापरासंबंधित उद्योगांमध्ये ग्राहकांना त्यांच्या नजीक उत्पादने उपलब्ध करून देऊ शकतील.
इव्होनिक इंडियाचे अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर विनोद पारेमल यांनी नवीन कार्यालय, त्याचप्रमाणे नाविन्यपूर्ण आणि सहयोगाला चालना देण्याच्या त्याच्या क्षमतेबद्दल आपली भावना व्यक्त केली- “आमचे नवीन कार्यालय केवळ आमच्या सदस्यांमध्ये अधिक सहकार्य आणि समन्वय साधणार नाही तर आमचे ग्राहक आणि भागीदारांच्या बदलत्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यास आम्हाला सक्षम करेल हा विश्वास आम्हाला वाटतो”, असे ते म्हणाले.
EIRH चे उद्घाटन इव्होनिकची दीर्घकालीन बांधिलकी आणि कंपनीची वाढ तसेच विस्तारासाठी एक प्रमुख बाजारपेठ म्हणून त्याच्या धोरणात्मक महत्त्वाला पुष्टी देते. नवोन्मेष, शाश्वतता आणि ग्राहक-केंद्रिततेवर भर देत, इव्होनिक इंडिया आपला यशाचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी समाज आणि पर्यावरणावर सकारात्मक परिणाम घडवून आणण्यासाठी सज्ज आहे, असे पारेमल म्हणाले.