मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी निमित्त ‘दिव्य तेज झळकती’ हा सुमधुर भक्तिमय गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी दिली.
उद्या गुरुवारी (ता. २९) रोजी सायंकाळी ६ वाजता (वांद्रे प.) रंगशारदा सभागृहात विनामूल्य कार्यक्रम होईल. भक्तीगीते, अभंग यांची सांगीतिक अनुभूती घेण्यासाठी सर्वांनी आवर्जून कार्यक्रमात सहभागी होवून वारीचा अनुभव घ्यावा असे आवाहन आ. ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.
कार्यक्रमात पंडित उपेंद्र भट यांच्यासह गायक संजीव चिम्मलगी, धनश्री देशपांडे, अमृता खोडके – दहिवलेकर गायन सादर करतील. संगीत संयोजन निरंजन लेले तर प्रसाद महाडकर यांचे संयोजन