पंतप्रधान 13 जुलै रोजी मुंबई दौऱ्यावर
पंतप्रधान 29,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन , लोकार्पण आणि पायाभरणी करणार
ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प आणि गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या बोगद्याच्या कामाची पंतप्रधान करणार पायाभरणी
नवी मुंबई इथल्या गतिशक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनलची आणि कल्याण यार्ड रिमॉडेलिंगसाठी पंतप्रधान करणार पायाभरणी
लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन प्लॅटफॉर्म आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील प्लॅटफॉर्म 10 आणि 11 चा विस्तार पंतप्रधान राष्ट्राला करणार समर्पित.
पंतप्रधान सुमारे 5600 कोटी रुपये खर्चाच्या मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेचा करणार प्रारंभ
मुंबईत इंडियन न्यूज सर्व्हिस सोसायटी (आयएनएस ) टॉवर्सचे पंतप्रधान करणार उद्घाटन