मुंब्रा देवी सेवा मंडळातर्फे महाशिवरात्री निमित्त प्रसादाचे वाटप
मुंब्रा सालाबाद प्रमाणे यंदाही महाशिवरात्रीचे अवचित साधून आणि मुंब्रा देवीच्या गडावर दर्शनासाठी जाणाऱ्या शिवभक्तांना व देवी भक्तांना मुंब्रा देवी सेवा मंडळातर्फे साबुदाणा खिचडी, शेंगदाणे, खजूर ,तसेच बिसलरी पाण्याच्या बॉटल प्रसादाचा स्वरूपात मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आल्या तापते ऊन व महाशिवरात्रीचा उपवास असल्याने या उपक्रमाचा लाभ दहा ते पंधरा हजार शिवभक्त व देवी भक्तांनी घेतला हे उपक्रम मुंब्रा देवी सेवा मंडळ वर्षातून दोनदा आयोजित करते मागील 35 ते 40 वर्षापासून हा उपक्रम सतत सदैव सुरू ठेवल्याबद्दल मुंब्रा कौसा विभागातील अनेक मान्यवरांनी उपक्रमाचे आयोजक मुंब्रादेवी सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री कांतीलाल (कांती) वाघमारे यांची प्रशासा करून शिवभक्तांना व देवी भक्तांना शुभेच्छा दिल्या उपक्रमात सर्व देणगी दार चे आभार मानून धन्यवाद देण्यात आले उपरोक्त उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुंब्रा देवी सेवा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व पद अधिकाऱ्यांनी परीक्षण घेतले असे प्रसिद्धी मुंब्रा देवी सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री कांतीलाल (कांती)वाघमारे यांनी कळविले आहे
धन्यवाद
