केदारनाथ रोप-वे प्रकल्पास केंद्र सरकारची मंजुरी; ९ तासांचा प्रवास अवघ्या ३६ मिनिटांत

Uncategorized

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज (बुधवार) झालेल्या बैठकीत केदारनाथ धामसाठी सोनप्रयाग ते केदारनाथपर्यंत १२.९ किलोमीटर लांबीच्या रोप-वे प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. या संदर्भात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती देताना सांगितले की, “या प्रकल्पामुळे सध्या ८ ते ९ तास लागणारा प्रवास अवघ्या ३६ मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.”

या प्रकल्पासाठी अंदाजे ₹४,०८१ कोटी खर्च येणार आहे. यामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असून प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगवान होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *