छावा चित्रपटातील काही वादग्रस्त मुद्द्यांवर म्हणजे छत्रपतींचे जावई संभाजीराजेंचे मेहुणे, महाराणी येसुबाई यांचे बंधु स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गणोजीराजे शिर्के व काका कान्होजीराजे शिर्के यांना फितूर दाखवत बदनाम केले जात असल्याचे ठाम मत इतिहास अभ्यासक इंदजीत सावंत यांनी अनेक पुरावे देऊन आपले म्हणणे मांडले होते. परंतु याचाच राग मनात धरून शिवद्रोही कोरटकर ने त्यांना फोन करून धमकी दिली होती.
इतिहासातील अन्य काही पात्र दोषि असताना राजे शिर्के कुटुंबाला नाहक टार्गेट करणे योग्य नाही हे सावंत वारंवार सांगत आहेत, काही विघ्नसंतोषी मंडळींना हे पहावत नसल्याने तसेच लेखक, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यावर खुली चर्चा करत असताना नागपुर येथील माथेफिरू शिवद्रोही प्रशांत कारटकर ने सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देत छत्रपती छत्रपती शिवरायांच्या घराण्यावर गलिच्छ भाषेत गरळ ओकत मराठ्यांच्या इतिहासाला ही अपमानित केले होते.
त्यात शंभुपत्नी महाराणी येसुबाई साहेबांचे म्हणजे स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गणोजीराजे शिर्के यांच्या वंशजांनी ही फितूरी मुद्यावर आक्षेप घेतला आहे. त्यावर वंशजांनी संबंधित शिवद्रोह्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली होती. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणी शिवद्रोही प्रशांत कोरटकर वर कारवाई होण्यासाठी पुणे येथील विमानतळ पोलिस स्टेशनला दिपकराजे शिर्के, लक्ष्मीकांत राजे शिर्के आदीं वंशजांनी तक्रार दाखल केली होती. आता जामीन होऊ नये यासाठी ही वंशज मंडळी मागणी करणार आहेत.
जय शिवराय जय शंभुराजे जय येसुबाई