“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांच्या ९५ हजार अर्जांची विक्रमी वेळेत छाननी: ठाणे महापालिकेचा पहिल्या टप्प्यातील यशस्वी उपक्रम”

*ठाणे:राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या, पहिल्या टप्प्यातील ९५ हजार अर्जांची छाननी ठाणे महापालिकेने शनिवार ०३ ऑगस्ट ते सोमवार ०५ ऑगस्ट या तीन दिवसात अहोरात्र काम करून विक्रमी वेळेत पूर्ण केली आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांचे आवश्यक मनुष्यबळ तसेच संपूर्ण तांत्रिक […]

Continue Reading

आई आणि बाळा मधील अंतर कमी करूया: स्तनपानाला समर्थन देऊया!

ठाणे – दरवर्षी १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान दिन हा संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. यावर्षीही केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह ठाणे जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागामार्फत साजरा केला जात आहे. स्तनपान करणाऱ्या मातांकरिता सुरक्षित वातावरण निर्माण करणे, बालमृत्यु कमी करणे, बाळाच्या जन्मानंतर पहिले […]

Continue Reading

गुजरात,महाराष्ट्र राज्यात चोरी करणारा अट्टल घरफोडी चोर अटक

श्रीनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३६१/२०२४ भा.द.वि. कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा, घटक ५ कडून सुरू असताना, दि. २५/०७/२०२४ रोजी गुन्हे शाखा, घटक ५, वागळे, ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळालेल्या बातमीवरून सदरचा गुन्हा करणारा आरोपीत नामे राजू शेख हा काही चोरीचे सोन्याचे व चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी कामगार […]

Continue Reading

धर्मवीर 2 च्या ट्रेलरला जिल्हाप्रमुख केदार दिघेंकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर

ठाणे:- “वीस वर्षांपूर्वी ठाण्यातील एक दाढीवाला बेसावध होता, जाता जाता दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेला …”या ऐवजी…”ठाण्यातील एक दाढीवाला गेली वीस वर्षे सत्तेची सर्व महत्वाची पद भोगत होता. जेव्हा चौकशीच्या भितीने गद्दारी केली तेव्हा जाता जाता सर्वच घेऊन गेला…” असा हल्लाबोल करत ठाकरेंच्या शिवसेनेचे केदार दिघे यांनी धर्मवीर- 2 चित्रपटाच्या ट्रेलर चा समाचार घेतला आहे. […]

Continue Reading

चितळसर पोलिसांची कारवाई: सोनसाखळी चोरटे १०.१४ लाखाच्या मुद्देमालासह अटकेत, ११ गुन्ह्यांची उकल

  ठाणे:-ठाण्याच्या चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या सोनसाखळी चोरीचा गुन्हा ३० जून, २०२४ रोजी दाखल झाला. त्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस पथक तपास करीत होते. पोलिसांनी तीन दिवस परिसरातील सर्वच सीसीटीव्ही तपासले आणि आरोपीच्या परिसरात सापळा रचून ५ जुलै रोजी आशिष कल्याण सिंग(३३) याला ताब्यात घेतल्यानंतर दिलेल्या माहितीवरून २२ ग्राम सोन्यासह अमित सिंग याला ताब्यात घेतले. […]

Continue Reading

अकस्मात मृत्यू समरी प्रकरणांची यादी जाहीर

ठाणे, दि.12:- फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 174(1)(अ)(ब) व (क) अन्वये प्राप्त झालेल्या अकस्मात मृत्यू समरी प्रकरणांबाबत फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 176(2) नुसार मयत व्यक्तीचे मृत्यूचे कारण दर्शविणारे व चौकशी करण्याबाबतचे ठाणे उपविभागाचे अधिकार उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, ठाणे उपविभाग या कार्यालयास आहेत. ठाणे महसूल उपविभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडून माहे […]

Continue Reading

पंतप्रधानांचा 13 जुलै रोजी मुंबई दौरा: 29,400 कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी

पंतप्रधान 13 जुलै रोजी मुंबई दौऱ्यावर पंतप्रधान 29,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन , लोकार्पण आणि पायाभरणी करणार ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प आणि गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या बोगद्याच्या कामाची पंतप्रधान करणार पायाभरणी नवी मुंबई इथल्या गतिशक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनलची आणि कल्याण यार्ड रिमॉडेलिंगसाठी पंतप्रधान करणार पायाभरणी लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन […]

Continue Reading

**कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावे अखेर नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट: मनसे आमदार राजू पाटील यांची अथक पाठपुरावा फळाला**

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी गेले अनेक वर्षे तेथील ग्रामस्थ करत होते. यासाठी त्यांनी सहावेळा ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार घातला होता. तसेच ही गावं नवी मुंबई पालिकेत समाविष्ट करण्याकरिता मनसेचे आमदार राजू पाटील स्वतः निवडून आल्यापासून करत आहेत आणि १४ गावं सर्वपक्षीय विकास समिती पाठपुरावा करत होती. मात्र कोरोना […]

Continue Reading

ठामपा आयुक्तांच्या आश्वासनानंतर दिव्यांगांचे आंदोलन मागे; निधी न देता खोटी माहिती दिल्याचा आरोप

ठाणे – सन 2022 मधील निधी वितरीत करून सन 2023 -2024 चा निधी वितरित केला आहे, अशी खोटी माहिती देऊन दिव्यांगांची बोळवण केली जात आहे, असा आरोप करीत अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे मुख्य निमंत्रक मोहम्मद यूसुफ मोहम्मद फारुक खान यांच्या नेतृत्वाखाली ठामपा मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलने करण्यात आली. दरम्यान, आयुक्त सौरव राव यांनी सर्व मागण्या […]

Continue Reading

मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲङ अनिल परब 44 हजार 784 मते मिळवून विजयी

  नवी मुंबई, दि. 01:-विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पी.वेलरासू विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 28 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 67 हजार 644 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 64 हजार 222 मते वैध ठरली […]

Continue Reading