*दिव्यांग संघटनेची गांधीगिरी* ठामपा अधिकाऱ्यांना गुलाब देऊन सादर केले सत्रा सूत्री मागण्यांचे निवेदन

Uncategorized

ठाणे *- गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने मागणीपत्र देऊनही ठामपा अधिकाऱ्यांकडून कार्यवाही होत नाही. त्या निषेधार्थ अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे निमंत्रक मोहम्मद यूसुफ मोहम्मद फारुक खान यांच्या नेतृत्वाखाली गांधीगिरी करण्यात आली. ठामपा उपायुक्त अनघा कदम, समाजकल्याणचे दयानंद गुंडप आणि दशरथ वाघमारे यांना गुलाब फूल आणि सत्रा मागण्यांचे निवेदन दिले. तसेच, या मागण्या मान्य न झाल्यास प्रजासत्ताक दिनी आंदोलन करण्याचा इशाराही दिला.*

दिव्यांगांनी यावेळी दिलेल्या निवेदनानुसार, संविधान आणि दिव्यांग अधिकार अधिनियम २०१६ अन्वये या दिव्यागांचे पुनःर्वसन करणे आणि त्यांच्या उत्थानासाठी काम करणे ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ठाणे महानगर पालिकेची जबाबदारी आहे.मात्र, ठाणे महानगरपालिका या जबाबदारीकडे दुर्लक्ष करीत आहे. ठाणे शहरातील दिव्यांगांनी आपले उदरनिर्वाह करण्याबाबत व्यवसायासाठी स्टाॅल देण्याचे अर्ज केले आहेत. मात्र, त्यांना अद्याप स्टाल/टपरी, गाळे उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत.
गेल्या काही वर्षांत *मुंब्रा,कौसा,दिवा कळवा आणि इतर प्रभाग समितीत अनधिकृत बांधकामांची संख्या वाढीस लागली आहे. अनधिकृत बांधकामांवर आणि मुंब्रा येथे भररस्त्यात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याबाबत मा. उच्च न्यायलयचे आदेश आणि विधानसभेत कारवाई बाबत स्थानिक आमदारांनी मुद्दा उचलून दबाव निर्माण झाल्यास मुंब्रा आणि इतर प्रभाग समितीचे भ्रष्ट अधिकारी फक्त आणि फक्त दिव्यांगांना लक्ष्य करीत आहेत* . अनधिकृत बांधकाम धारकांकडून आणि अनधिकृत फेरीवाल्यांकडून मोठ्याप्रमाणात मलिदा मिळत असल्याने त्यांच्यावर कारवाई न करता संविधान आणि दिव्यांग अधिकार अधिनियम २०१६ अन्वये हक मिळत नसल्याने स्वतःचे आणि कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्यासाठी प्रवृत्त फक्त आणि फक्त गोरगरीब दिव्यांगांचे स्टाल तोडत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ठाणे महानगर पालिकेकडून दिव्यांग विकास निधीचा विनियोग केला जात नाही. परिणामी दिव्यांगांच्या उत्थानाचे कार्य होत नाही. त्या अनुषंगाने आम्ही खालील मागण्या करीत आहोत. *या मागण्यांची पूर्तता न झाल्यास 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनीच ठामपा मुख्यालयासमोर अर्धनग्न आंदोलनास बसू* , असा इशाराच दिव्यांगांनी दिला आहे.
दरम्यान, ठामपाकडून नवीन दिव्यांग स्टाल मंजूर झालेले नसल्याने जे दिव्यांग स्टाल लावत आहेत.त्यांच्यावरील कारवाई रहित करावी; ज्या दिव्यांगांच्या स्टालवर कारवाई केली आहे. त्यांना स्टाल परत करण्यात यावेत; लवकरात लवकर दिव्यांगांना नवीन स्टाॅल देण्यात यावेत; २०२३-२४ आणि २०२४-२५ चे दिव्यांगांचे अनुदान ठाणे महानगर पालिका यांनी लवकरात लवकर वाटप करावे.; दि.०३.१२.२०१८ रोजी ज्या दिव्यांगव्यक्ती व्यवसायी साठी जागा उपलब्ध करून दिले असता सदर जागा व्यवसायभिमुख नसल्याने व्यवसाय होत असलेली जागा बदली करून देण्यासाठी १५० ते २०० स्टाॅल धारकांना जागा महासभा होत नसल्याचे कारण पुढे करून स्थावर मालमत्ता विभाग सदर जागा बदलून देत नसल्याने दि.०२.१०.२०२३ रोजी ठाणे महानगरपालिका समोर मुंडन करून आंदोलन केल्या असता स्थानिक पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मा.अतिरिक्त आयुक्त श्री.प्रशांत रोडे साहेब यांच्या आश्वासन नंतर तूर्तास आंदोलन स्थगत केले असता आजतगत सदर आश्वासनाची पूर्तता करण्यात आली म्हणून सदर व्यवसाय साठी दिलेले जागेवर व्यवसाय होत नसल्याने जागा बदली करून देण्यसाठी दिलेले अर्ज अन्वये जागा बदली करून देण्याच्या निर्णय बाबत सदर प्रकरण ज्यांच्या अहवाल प्राप्त झाला. त्या दिव्यांग स्टाॅलधारकांच्या जागा बदलीचे प्रकरण सुरु असलेली प्रशासकीय महासभेत मंजूर करून लवकरात लवकर जागा बदली करून द्यावी; दिव्यांग अधिकार अधिनियम 2016 अन्वये दिव्यांगांना सक्षम बनविण्यासाठी कलम ३७ अन्वये अर्थ संकालापात एकूण उत्पन्नातील ५% टक्के निधी तरतूद करण्यासाठी नमूद असून वर्ष २०१७ पासून २०२४ पर्यंत एकूण एकूण उत्पन्नातील ५% टक्के निधी तरतूद केले असेल त्याची संपूर्ण तपशीलवार माहिती वर्ष निहाय एकूण उत्पन्न आणि तरतूद केलेले निधी द्यावी; देशाचे प्रधानमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेले आदेशनुसार शासकीय आणि ठामपाच्या लाभ घेणाऱ्या लाभार्थी यांच्या आधार लिंक करावे, त्या बाबत वारंवार पत्र देवून या विषयी गांभीर्याने घेतले नाही म्हणून जे संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर जे कारवाई केली आहे त्या बाबत माहिती द्यावी; राज्यातील दिव्यांग व्यक्तींची नोंदणी जन्म आणि मृत्यू प्रमाणे करण्याकरिता 1. शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण–२०१३/मुमंस-३१प्र.क्र.८८/नावि-२०,दि. ०४ ऑक्टोबर २०१३, 2. शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण–२०१३/मुमंस-३१,प्र.क्र.८८/नावि-२०,दि. २० ऑगस्ट २०१५, अन्वये नोंद घेण्यासाठी मे. सिमॅक आय. टी.प्रा.लि. कंपनीचा या कंपनीला ठेका दिला होता. TMC/ठामपा/स.वि./काअ – 22 दिनांक – 10.07.2018 रोजी अन्वये, 3.राज्यातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करण्याबाबत शासन निर्णय क्र.: दिव्यांग 2024/प्र.क्र.36/दिव्यांग कल्याण-3,दिनांक :- 16 मार्च, 2024 रोजी अन्वये त्या बाबत आपले कार्यलयात वारंवार पत्र देवून या विषयी गांभीर्याने घेतले नाही म्हणून जे संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर जे कारवाई केले आहे त्या बाबत माहिती द्यावी; तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी तरतूद करण्यात येत असलेली निधीतून दिव्यांग व्यक्तींना सक्षम करण्याबाबत त्या बाबत आपले कार्यलयात वारंवार पत्र देवून या विषयी गांभीर्याने घेतले नाही म्हणून जे संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर जे कारवाई केले आहे त्या बाबत माहिती द्यावी; दिव्यांगांचे ५ टक्के स्टॉल,गाळे,माल मध्ये दुकाने, घरे व नोकरी यांचे फॉर्म काढून लवकरात लवकर वाटप करावे; दिव्यांग व्यक्तींना कायदे अन्वये सक्षम बनविण्यासाठी योजना बनविण्यापूर्वी संघटना समितीला विचारात घेण्यात येईल असे दि :- १०.०५.२०२३ इत्तीवृत क्र. ठामपा/सविवि/उपआ-१२० अनुसार नमूद केले असून सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात योजना बनविण्यापूर्वी संघटना समितीला विचारात घेण्यात का आला नाही आणि इतर दिव्यांग व्यक्तींना कायदे अन्वये सक्षम करावा; *मुंब्रा कौसा,दिवा कळवा आणि इतर प्रभाग समिती हद्दीत सुरु असलेले सर्व अनधिकृत बांधकाम तोडण्यात / थांबवावे. अनधिकृत फेरीवाल्यांवर करण्यात यावी* या सर्व प्रकाराला स्थानिक अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्या विरुद्ध शिस्त भंगाची कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावेत; दिव्यांग ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या घराचे फोटोपास काढून नोंदणी करावी; दिव्यांगांना टॅक्स व पाणी बिल मध्ये ५० टक्के सुट द्यावी; ठाणे महानगरपालिका ५टक्के स्विकृत नगरसेवक, तसेच विविध समित्यांवर दिव्यांग सदस्य म्हणून नेमणूक करावी.आणि शासनास मंजुरी साठी प्रस्ताव पाठविण्यात यावी; ठाणे महानगर पालिका समाज विकास विभागातील भ्रष्ट आणि कामचुकार अधिकाऱ्यांवर दिव्यांग अधिनयिम २०१६ नूसार कलम ९२ अन्वये कारवाई करुन त्याजागी सक्षम अधिकारी यांची नेमणुक करावी; राज्यात अनेक बोगस दिव्यांग कर्मचारी बोगस उघड होत आहे.ठामपा बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची दिव्यांग फेर तपासणी करावी, आदी मागण्यांचे निवेदनही देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *