ठाणे, दि. 09, जिमाका १४९ मुंब्रा कळवा मतदार संघामध्ये मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही मतदार वंचित राहू नये यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीसाठीही 85 वरील ज्येष्ठ मतदारांसाठी व दिव्यांग मतदारांसाठी घरूनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. गृहमतदानास आज दिनांक ९/११/२०२४ पासून सुरूवात झाली असून १४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात 85 वरील 10 ज्येष्ठ मतदारांनी,11 दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती १४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी मा.श्री. विठ्ठल इनामदार यांनी दिली.
40 टक्के अंपगत्व (Locomotive) व 85 वर्षांवरील वृद्ध यांच्याकरिता भारत निवडणूक आयोगामार्फत 12 D नमुना भरून घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्या इच्छुक मतदारांनी विधानसभा निवडणुक 2024 ची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे 12 D फॉर्म भरून दिले होते त्यापैकी पात्र मतदारांनी आज टपाली मतदान करुन आपला अधिकार बजावला.
१४९ मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात दिनांक ९/११/२०२४ रोजी झालेल्या गृहमतदानाची आकडेवारी
*वय वर्षे 85 व त्यावरील मतदार* *10*
*दिव्यांग मतदार 11*