सिंधुदुर्गातील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी कडून ठाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक

Uncategorized

ठाणे: सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर कोट्यवधी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.यामुळे शिवप्रेमी दुखावले असून त्यांच्यामध्ये प्रचंड संतापाची लाट आहे.या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे.

हा पुतळा उभारण्याचे कंत्राट मोठे पुतळे उभारण्याचा कोणताही अनुभव नसलेल्या कल्याणमधील जयदीप आपटे या २४ वर्षीय कंत्राटदाराला देण्यात आले. स्थानिकांनी या बांधकामांवर काही हरकती घेतल्या होत्या परंतु टक्केवारीत अडकलेल्या या भ्रष्ट सरकारकडून पद्धतशीरपणे याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

या संपूर्ण घटनेची चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी महाविकास आघाडी तर्फे तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करत या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.यावेळी महाराजांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक करण्यात येऊन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला तसेच घडलेल्या घटनेबाबत माफी मागण्यात आली.यानंतर पोलीस सह आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांची भेट घेत सदर घटनेची लवकरात लवकर उच्चस्तरीय चौकशी करून दोशींवर कडक कारवाई करण्यात यावी याबाबत निवेदन देण्यात आले.

यावेळी माजी खासदार राजन विचारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुहास देसाई, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष केदार दिघे,ठाणे काँग्रेस चे प्रवक्ते राहुल पिंगळे,महिला अध्यक्ष स्मिता वैती,सेवादल अध्यक्ष रवी कोळी,युवक अध्यक्ष आशिष गिरी ,प्रदेश ओबीसी उपाध्यक्ष सुरेश खेडे पाटील,रमेश इंदीसे,निशिकांत कोळी यांच्यासह इतर मान्यवर महिला आघाडी तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *