“शिक्षणापासून वंचित ठेवलेल्या विद्यार्थ्यांसाठी मनविसेचा आंदोलनाचा इशारा, प्रभाकर देसाई यांच्याशी चर्चा निष्फळ”

डोंबिवली

राज्य सरकारच्या कोणत्याही यंत्रणाची परवानगी नसताना सहा हजार विद्यार्थ्यांना अनुदानित शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या संस्थाचालक प्रभाकर देसाई यांच्यासोबत *मनविसे अध्यक्ष श्री अमित साहेब ठाकरे* यांच्या आदेशानुसार *महाराष्ट्र प्रदेश राज्य संघटक श्री संतोष गांगुर्डे* यांच्या नेतृत्त्वात कल्याण *जिल्हा अध्यक्ष धनंजय गुरव, डोंबिवली शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे* व मनविसे शिष्ठमंडळ यांची एक तास अधिक प्रदीर्घ चर्चा झाली.

चर्चेअंती संस्थाचालकांना मनविसे शिष्ठमंडळाला कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे शासन दरबारी जाब विचारुन मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा ईशारा दिला.
याबाबत शिष्ठमंडळाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची भेट घेऊन त्यांच्याही समस्या जाणून मनविसे पूर्णपणे त्यांच्यासोबत आहोत असे आश्वासन दिले..
यावेळी मनविसे कल्याण लोकसभा जिल्हा सचिव प्रितेश पाटील, उपजिल्हा अध्यक्ष दिप्तेश नाईक, शहर सचिव प्रितेश म्हामुणकर, उपशहर अध्यक्ष प्राजक्ता देशपांडे, यतिन पांडगावकर, प्रतीक देशपांडे, शहर संघटक हरिश पाटील, संजय चव्हाण व मनविसे पदाधिकारी सहकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *