महाराष्ट्र:मुंबई विद्यापीठाच्या इंटर कॉलेज महिला बॉक्सिंग स्पर्धेत वैशवी विनोद लोकरेने आपल्या कौशल्याने आणि मेहनतीने सुवर्णपदक पटकावले आहे. ही स्पर्धा विविध महाविद्यालयांमधील उत्कृष्ट खेळाडूंना आपल्या खेळाची चमक दाखवण्याची संधी देते, आणि या स्पर्धेत वैशवीने आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली.
वैशवी वाशी येथील केबीपी महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून ती बीएससी बायोटेक्नॉलॉजीचे शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच आपल्या खेळामध्ये उत्तम प्रगती करत तिने या विजयाने महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे.
मरीन बॉक्सिंग सेंटर अकॅडमीमध्ये प्रशिक्षक सिद्धार्थ सर आणि दर्शन सर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने कठोर मेहनत घेतली. या विजयामध्ये तिच्या प्रशिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे.
वैशवीने आपल्या कामगिरीने महाराष्ट्रातील युवा खेळाडूंना प्रेरणा दिली असून, तिच्या या यशाचे कौतुक सर्वत्र होत आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.