डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (#बार्टी), पुणे यांच्या “जात प्रमाणपत्र पडताळणी माहिती प्रणाली” मराठीत उपलब्ध करण्याचे निर्देश

Uncategorized

महाराष्ट्र शासनाच्या “आपले सरकार” पोर्टलवर नोंदविलेल्या तक्रारीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांनी “जात प्रमाणपत्र पडताळणी माहिती प्रणाली” (#CCVIS) १००% मराठीत उपलब्ध करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे.

#मराठी भाषेच्या संवर्धनासाठी व अधिकृत शासकीय प्रक्रियांमध्ये मराठी भाषेचा वापर सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने मराठी एकीकरण समितीची मागणी महत्त्वपूर्ण ठरली आहे. समिती महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात सक्रिय असून अशा अनेक विषयांवर कार्यरत असून, महाराष्ट्रात मराठीचा #झेंडा सदैव फडकवत ठेवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे.

आनंदा पाटील
उपाध्यक्ष,
#मराठीएकीकरणसमिती महाराष्ट्र राज्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *