ठाणे शहर जि. काँग्रेस कमिटीच्या 8 जणांची पक्षातून निलंबित विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका

Uncategorized

ठाणे, दि. १९ – नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधात जाऊन पक्ष शिस्तभंग केल्या कारणास्तव ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अॅड. विक्रांत चव्हाण यांनी ८ जणांना पुढील आदेश येईपर्यंत पक्षातून निलंबित करून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे कळविले आहे.
सुरेश पाटील-खेडे उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेल यांनी काँग्रेस पक्षाचा आदेश न पाळता विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविल्या बद्दल वरिष्ठांच्या आदेशान्वये त्यांचीही पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी केली आहे.
ब्रिजेश चौरसिया (वॉर्ड अध्यक्ष), जयप्रकाश वेद (वॉर्ड अध्यक्ष), संतोष जोशी (मा. ब्लॉक अध्यक्ष), गुलाबसिंग यादव (उपाध्यक्ष, उत्तर भारतीय सेल), मंजूर खत्री (प्रमुख, सोशल मिडिया) आणि गिरीष कोळी (सरचिटणीस, ठाणे शहर जिल्हा काँग्रेस) यांनी विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार मनोज शिंदे यांच्या निवडणूक प्रचार कार्यात सहभागी होऊन पक्षशिस्त भंग केली तर रेखा मिरजकर या बंडखोर उमेदवार सुरेश पाटील-खेडे यांच्या प्रचार कार्यात सहभागी झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावरही अशाप्रकारे कारवाई करण्यात येत असल्याचे ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अॅड. विक्रांत चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *