*ठाणे,दि.02(जिमाका):-* ठाणे जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामार्फत दि.7 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे येथे महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यातील लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) यांना निर्यात संबंधित योजना व उपक्रमांबद्दल माहिती देणे तसेच निर्यात तज्ज्ञांच्या मदतीने त्यांना मार्गदर्शन व सहकार्य प्रदान करणे हे या संमेलनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
हे संमेलन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून विकास आयुक्त (उद्योग) आणि महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा सेल (MAITRI) चे अध्यक्ष, राज्याचे निर्यात आयुक्त श्री.दीपेंद्र सिंह कुशवाह (भा.प्र.से.) उपस्थितांना मागदर्शन करणार आहेत.