– ठाणे ग्रामीण भागातील आदिवासी, ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी व्यवस्थित व्हावी यासाठी मेकिंग द डिफरन्स एनजीओ आणि पीपीएफएएस म्यूचुअल फंड कंपनीच्या सीएसआर फंड द्वारे मेकिंग द डिफरन्स संस्थेच्या मदतीतून संजीवनी प्रकल्पाद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र वज्रेश्वरी, ता. भिवंडी येथे ९७ प्रकारचे विविध वस्तू देण्यात आल्या. दि. २४ डिसेंबर, २०२४ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
रुग्णांना फायदा होईल अशा अत्यावश्यक वस्तू कंपनीच्या फंडच्या माध्यमातून देण्यात आले असून प्राथमिक आरोग्य केंद्रांतील लोकसंख्या पाहता ३८ हजार २४२ इतकी आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत २७ गावांचा, ५३ पाडे व १६ ग्रामपंचायतींचा समावेश होतो. या सर्व ग्रामस्थांच्या, रुग्णांना आरोग्यासाठी विविध सोईसुविधा वेळोवेळी पुरविणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. ही गरज लक्षात घेता मेकिंग द डिफरन्स एनजीओ आणि पीपीएफएएस म्यूचुअल फंड संस्थेमार्फत विविध वस्तू दिल्या बद्दल मी आभार मानतो, अशा प्रकारे शासकीय आरोग्य केंद्रांची प्रगती होण्यासाठी इतर संस्थांनी देखील पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले.
आरोग्य केंद्र अंबाडी वसई महामार्ग मध्यवर्ती असल्याने अपघात होण्याची शक्यता जास्त असल्याने अतिसंवेदनशील प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. आदिवासी, डोंगरी भागात सर्प दंश, अपघात, प्रसूती अशा आरोग्य सेवा पुरवण्यासाठी विविध आवश्यक वस्तुची गरज प्राथमिक आरोग्य केंद्रांना असते. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात लोकांचे आरोग्य सेवा सुधारण्यासाठी इतर संस्थांनी देखील पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले.
प्राथमिक आरोग्य केंद्रात दिलेल्या विविध उपयोगी वस्तुची किमंत ३५ लाख असून मल्टीपॅरा मॉनिटर, आयसीयु बेड, स्ट्रेचर, बेबी वॉर्मर, टेबल, खुर्ची, मेडीसीन ट्रॉली, डीप फ्रिजर, फ्रिज, ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेशन, ऑक्सीजन सिलेंडर, ऑपरेशन इंस्ट्रूमेंट, फंक्शन बेड अशा एकूण ९७ वस्तू प्राथमिक आरोग्य केंद्रास दिल्या आहेत.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राची माहिती व वैशिष्ट सांगण्यासाठी “सुंदर माझा दवाखाना” हे आरोग्य गीत आरोग्य सेवक प्रभाकर भेरे आणि आशा यांनी सादर केले.
यावेळी डॉ. माधव कावळे, सरपंच ग्रामपंचायत वज्रेश्वरी रमेश जाधव, सरपंच गणेशपुरी संदीप खिराडे, प्रोजेक्टचे प्रमुख अध्यक्ष संस्थापक दिपक विश्वकर्मा, समन्वयक प्रदिप विश्वकर्मा, पीपीएफएएस म्यूचुल फंड चे प्रिया हरियाणी, संजना जाधव, द्विति मेहता, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रुती मंचिकटला, वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.