श्रीनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३६१/२०२४ भा.द.वि. कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा, घटक ५ कडून सुरू असताना, दि. २५/०७/२०२४ रोजी गुन्हे शाखा, घटक ५, वागळे, ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळालेल्या बातमीवरून सदरचा गुन्हा करणारा आरोपीत नामे राजू शेख हा काही चोरीचे सोन्याचे व चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी कामगार नाका, वागळे इस्टेट, ठाणे येथे येणार आहे. अशी माहिती मिळताच पो.उप.निरी. तुषार माने व पोलीस पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून आरोपीत राजू मोहंमद जेनल शेख उर्फ बंगाली (वय ४१ वर्षे, रा. जनता सेवक सोसायटी, मोरी रोड, मुंबई, मूळ रा. कांथाना बाझार, थाना विशाळगड, जि. सोनामोरा, अगरतळा, त्रिपुरा) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून एकूण १,१३,१००/- रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आले आहे. तपासामध्ये त्याच्याकडून श्रीनगर व कापुरबावडी पोलीस स्टेशन मधील आणखी ७ गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर आरोपीविरुद्ध गुजरात, महाराष्ट्र इत्यादी राज्यांमध्ये यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याचा अधिक तपास पो.उप.निरी. तुषार माने, गुन्हे शाखा, घटक ५, ठाणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री पंजाबराव उगले, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री शिवराज पाटील, मा. सहा पोलीस आयुक्त शोध १ (गुन्हे) श्री. शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक ५ वागळे, ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विकास घोडके, सहा पोलीस निरीक्षक भुषण शिंदे, पल्लवी ढगेपाटील, अविनाश महाजन, पो.उप.नि. तुषार माने, पोहवा/सुनिल निकम, पोहवा/विजय काटकर, पोहवा/रोहीदास रावते, पोहवा/सुशांत पालांडे, पोहवा/विजय साबळे, मपो.हवा/मिनाक्षी मोहीते, पोहवा/माधव वाघचौरे, पोना/तेजस ठाणेकर, पोना/रघुनाथ गार्डे, पोशि/यश यादव या पथकाने केली आहे.