बंगळूरु : विघ्न आणि अडथळे दूर करणारा विघ्नहर्ता आंदोलकांसह पोलिस व्हॅनमध्ये बसला असल्याचं आढळून आलं. आता गणेशावरच संकट ओढवलं असल्यामुळेे ही गोष्ट वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सोशल मीडियावर अनेक ठिकाणी फोटो आणि व्हिडीओ शेअर केले जात आहेत. आमच्या बाप्पाने असं काय केलं की त्यालाही पोलिसांच्या गाडीत गुन्हेगाराप्रमाने ठेवायची वेळ आली? असा सवाल देखील उपस्थीत केला जात आहे.
प्रधानमंत्र नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेवर वक्तव्य केलं आहे. “काँग्रेस शासित कर्नाटकात तर गणपतीलाही तुरुंगात टाकले जात आहे,” असे पीएम मोदी यांनी हरियाणातील एका निवडणूक सभेत म्हणाले.
नक्की बंगळुरुमध्ये काय घडलं?
ही घटना बंगळुरुमधील नागमंगला येथील आहे. इथे गणपती विसर्जन दरम्यान दोन गटांमध्ये वाद झाला. ज्यामध्ये जाळपोळ देखील केली गेली, या हल्ल्याचा निषेध करत उजव्या विचारसरणीच्या गटांनी राज्यभर निषेधाची योजना आखली आणि या प्रकरणाची NIA चौकशीची मागणी केली. राज्याच्या राजधानीत बेंगळुरू महानगर गणेश उत्सव समितीतर्फे शहरातील टाऊन हॉल परिसरात निदर्शने करण्यात आली. त्यांना निषेधासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली होती, तरीही निषेधाचा भाग म्हणून लोकांना टाऊन हॉलमध्ये एकत्र येण्यास सांगणारा व्हॉट्सॲप संदेश प्रसारित करण्यात आला.
बेंगळुरूमधील नियमांनुसार, निदर्शनांसाठी नियुक्त क्षेत्र फ्रीडम पार्क आहे. शहर पोलिसांना टाऊन हॉलमध्ये लोक जमा करण्याच्या योजनेची माहिती मिळताच पोलिसांच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या. आंदोलक छोट्या गटात येऊ लागले आणि सकाळी 11.30 पर्यंत जवळपास 20 ते 30 लोक जमले आणि तासाभरात घोषणाबाजी केली.
आंदोलक पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय जमले असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पार्क केलेल्या पोलिस व्हॅनकडे नेण्यास सुरुवात केली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने न्यूज 18 ला सांगितले की, विसर्जनासाठी गणेशमूर्ती घेत असल्याचा दावा करणाऱ्या लोकांचा एक गट निषेधात सामील झाला. त्यांनी सुमारे 1.55 फूट उंचीची गणेशमूर्ती डोक्यावर धरली होती आणि घोषणाबाजी सुरू केली.
जाहिरात
जाहिरात
“पोलिसांनी आधीच आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती आणि गणेशमूर्ती जमिनीवर पडल्याचे लक्षात येताच एका पोलीस अधिकाऱ्याने त्वरीत मूर्ती उचलून सुरक्षित ठिकाणी ठेवली,” असे बेंगळुरूचे पोलिस आयुक्त बी दयानंद यांनी न्यूज18 ला स्पष्ट केले.
जाहिरात
छायाचित्रांमध्ये एक निरीक्षक मूर्ती घेऊन आंदोलकांसाठी असलेल्या रिकाम्या पोलिस व्हॅनमध्ये ठेवताना दिसत आहे. व्हॅनमध्ये एकट्या गणेशाने फोटोकाढणाऱ्याचे लक्ष वेधून घेतले आणि नंतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. नंतर आंदोलकांना व्हॅनमध्ये बसवून गणेशमूर्ती पोलिसांच्या जीपमध्ये नेण्यात आली.
पोलीस व्हॅनमध्ये मूर्ती ठेवण्याच्या कृत्याचा भाजपने निषेध केला. भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी सोशल मीडिया साइट X वर तीव्र नापसंती व्यक्त केली.
जाहिरात
पोलीस आयुक्तांनी याचा प्रतिवाद करत म्हटले: “आम्ही गणपतीकडे लक्ष न देता त्याला कसे एकटंच जमीनीवर सोडू शकतो? आमच्या अधिकाऱ्याने खात्री केली की मूर्ती सुरक्षितपणे नेण्यात आली आणि ती विसर्जनासाठी नेण्यात येणार असल्याने, विसर्जन स्थानिक पोलीस ठाण्यात सर्व आदराने आणि भक्तिभावाने करण्यात आले. व्हॅनमधील गणेशाचे चित्र दाखवते की आम्ही मूर्तीचे पावित्र्य आणि आदर कसा राखला आहे, यामागे दुसरं काहीचं नाही.”
पोलीस विभागाच्या परवानगीशिवाय करण्यात आलेल्या या आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल चाळीस लोकांना अटक करण्यात आली होती.
टॉप व्हिडीओज
4/5
तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी 30 हजारांचे अर्थसहाय्य, पाहा कोण पात्र
5/5
कोकणात गणपती विसर्जनाची अनोखी पद्धत, गावकरी एकत्र जमा करतात गणपतीचे निर्माल्य
1/5
44 वर्षांपूर्वीची एक घटना अन् थेट मशिदीत बसवला गणपती! सांगलीतील गावात काय घडलं?
2/5
मुंबई, पुण्यात पावसाची शक्यता, विदर्भात कशी राहील परिस्थिती?
3/5
नाद करा पण शेतकऱ्यांचा कुठं.., एकाच दिवशी एकाच गावात आणले 15 ट्रॅक्टर
4/5
तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी 30 हजारांचे अर्थसहाय्य, पाहा कोण पात्र
5/5
कोकणात गणपती विसर्जनाची अनोखी पद्धत, गावकरी एकत्र जमा करतात गणपतीचे निर्माल्य
1/5
44 वर्षांपूर्वीची एक घटना अन् थेट मशिदीत बसवला गणपती! सांगलीतील गावात काय घडलं?
2/5
मुंबई, पुण्यात पावसाची शक्यता, विदर्भात कशी राहील परिस्थिती?
“हिंदू सण साजरे करण्यावर बंधने आहेत असे दिसते. ते इतर समाजावरही निर्बंध का लादत नाहीत? नागमंगलामध्ये आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. शांततापूर्ण विसर्जन मिरवणुकीचा भाग म्हणून लाठीचार्ज करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. टाऊन हॉलमध्ये याविषयी आंदोलन करण्यात आले. त्याऐवजी, त्यांनी गणेशमूर्ती काढून घेतली आणि होयसाळ (पोलिस व्हॅन) मध्ये ठेवली. फोटो ज्या प्रकारे पोलीस अधिकारी मूर्तीसोबत धावताना दाखवतात, जणूकाही गणेशच गुन्हेगार आहे, ते हृदय पिळवटून टाकणारे होते,” भारद्वाज म्हणाले.