24 तासासाठी मुंब्रा पोलीस स्टेशन धिम्म्यागतीवर..? काय आहे नेमकं प्रकरण

Uncategorized

दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजेपासून ते 19 फेब्रुवारी 2024 च्या रात्री पर्यंत संपूर्ण मुंब्रा पोलीस स्टेशनची कामकाजं, जणू 24 तासासाठी थांबविण्यात आले होते की काय…? अशी संपूर्ण मुंब्राभर चर्चा होती.
या चर्चे मागचे कारण म्हणजे शरदचंद्र पवार गटातल्या मुंब्रा शहरातल्या एका मोठ्या नेत्याच्या जावयावर एका महिलेने बलात्काराचा आऱोप केला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच गटाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या भाचीनेच हा आरोप केला होता. संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये हा विषय, नेमका कसा सुटेल ह्याकडेचं सर्व बिल्डर लॉबीचे लक्ष लागून होते, याची माहिती आम्हाला सुत्रांकडून मिळालेली आहे.
त्यामुळे 24 तासात मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराची FIR दाखल होणार की नाही..? याचाच प्रश्न पत्रकारांपासून सर्वांना पडला होता आणि डिजिटल महाराष्ट्र सुद्धा ह्या प्रकरणात विशेष लक्ष ठेवून होता. शेवटी 19 फेब्रुवारीच्या रात्री हा तिडा सुटला आणि FIR रजिस्टर करण्यात आली नाही, मात्र ह्या प्रकरणात करोडोंची सेट्लमेंट झाल्याची धक्कादायक माहिती आम्हाला सुत्रांकडून मिळालेली आहे. त्याकरिता त्यावेळेचे संबंधित मुंब्रा पोलीस स्टेशनमधील 18 ते 19 फेब्रुवारी 2025 मधील आडियोसहीत सर्व फुटेज आरटीआयच्या माध्यमातून जगजाहिर होणे अति महत्वाचे आहे.
ही बातमी दाखविण्याचे कारण म्हणजे; महाराष्ट्रातल्या कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये सर्व सामान्य व्यक्ती त्याची तक्रार देण्यास गेल्यानंतर त्यास कसा विलंब होतो, त्याच्याशी कसे उद्धटपणे बोलले जाते, त्याला कधी-कधी तर पोलीस स्टेशनच्या बाहेर थांबावे लागते, मात्र पैशेवाल्यांना कॅबिनमध्ये बसवून चाय देत चर्चा केली जाते, याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे CCTV फुटेज समोर येतील याची आम्ही अपेक्षा करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *